Olympic 2024 Paris Mayor Anne Hidalgo swims in seine river: फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. २६ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान संपूर्ण जगाच्या नजरा या शहरावर असतील. ऑलिम्पिक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तत्पूर्वी शहरातून वाहणाऱ्या सेन नदीबाबतचा वाद आता शमल्याचे दिसत आहे. पॅरिसच्या ६५ वर्षीय महापौर अॅनी हिडाल्गो त्याच नदीत पोहत ती नदी किती स्वच्छ आणि ऑलिम्पिक क्रिडा स्पर्धेसाठी योग्य आहे, याचा पुरावा दिला.
हेही वाचा – Team India: रोहित शर्मा आणि गौतम गंभीरची कर्णधार म्हणून सूर्यकुमारच्या नावाला पसंती?
Olympicपूर्वी पॅरिसच्या महापौर सेन नदीत उतरल्या
हिडाल्गो यांच्यासह पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चे प्रमुख टोनी एस्टँग्युएट आणि त्या प्रदेशातील सर्वोच्च सरकारी अधिकारी, मार्क गुइलॉम आणि स्थानिक स्विमिंग क्लबमधील जलतरणपटू या नदीत उतरले होते. “सेन नदी अप्रतिम आहे. पाणी खरंच खूप चांगले आहे. थोडे थंड आहे पण इतके काही वाईट नाही,” हिडाल्गो म्हणाला. कॅनोइंगमध्ये तीन ऑलिम्पिक सुवर्णपदके मिळविणारे एस्टँग्युएट म्हणाले, “वीस वर्षे नदीत पाण्यातील खेळ खेळल्यानंतर आम्ही ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहोत ही बाब प्रशंसनीय वाटते.
हेही वाचा – Natasa Stankovic: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशा स्टॅनकोविकने लेकासह सोडलं घर, एअरपोर्टवरील VIDEO आला समोर
२६ जुलै रोजी सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांपूर्वी नदीची स्वच्छता दाखविण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा एक भाग आहे. ज्यामध्ये सेन नदीवरील बोटींवर खेळाडूंच्या परेडचा समावेश आहे. जूनच्या सुरुवातीस दैनंदिन पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचण्यांमध्ये ई. कोलाय बॅक्टेरियाची असुरक्षित पातळी दर्शविली होती, त्यानंतर अलीकडील सुधारणा झाल्या.
पॅरिसची सेन नदी अनेक वर्षांपासून आपल्या अस्वच्छतेमुळे चर्चेत आहे. अस्वच्छतेमुळे या नदीत गेल्या १०० वर्षांपासून पोहण्यास बंदी आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील मॅरेथॉन जलतरण आणि ट्रायथलॉन स्पर्धा या नदीवर होणार आहेत. या नदीच्या स्वच्छतेसाठी ११ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे.
जूनमध्ये नियोजित फ्रान्समधील संसदीय निवडणुकांमुळे हिडाल्गो यांचे या नदीत पोहणे पुढे ढकलण्यात आले. सुरूवातील सोशल मीडियावर एक हॅशटॅग “jechiedanslaSeine” (“I’m pooping in the Seine”) ट्रेंड झाला होता. ज्यामध्ये काहींनी या नदीत शौच करून ऑलिम्पिकला विरोध करण्याची धमकी दिली. यामुळे हिडोल्गोंनी माघार घेतली नाही आणि या कार्यक्रमासाठी उभारलेल्या कृत्रिम तलावावरील शिडीचा वापर करून बुधवारी पॅरिसच्या महापौर नदीत उतरल्या. या कार्यक्रमासाठी सात सुरक्षा बोटी तैनात करण्यात आल्या होत्या.