Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सर्वच खेळाडू एकापेक्षा एक जबरदस्त कामगिरी करत पदकाला गवसणी घालत आहेत. भारताने नेमबाजीत दोन कांस्य पदक जिंकली आहे. मनू भाकेर हिने नेमबाजीत महिला १० मी एअर पिस्तुल स्पर्धेत पहिलं पदक जिंकवून देणार, तर मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग यांनी मिक्स्ड १० मी एअर पिस्तुल स्पर्धेत अजून एक कांस्यपदक जिंकलं आहे. काही खेळाडू हे चांगली कामगिरी करत आहेत तर काहींच्या पदरी निराशा पडली आहे. यादरम्यान भारताच्या एका खेळाडूने निवृत्ती घेतली आहे.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 4: भारताचा हॉकी सामन्यात दणदणीत विजय, सात्त्विक-चिरागचा दबदबा कायम; तिरंदाज भजन कौर पुढील फेरीत

BCCI may drop 4 senior players after WTC Final 2025
BCCI : ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ठरवणार भारताच्या ‘या’ चार वरिष्ठ खेळाडूंचे भवितव्य, BCCI घेणार मोठा निर्णय
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
IND vs NZ Five Reasons for India Defeat
IND vs NZ : भारतीय संघावर का ओढवली मायदेशात मालिका पराभवाची नामुष्की?
WTC Points Table India Lost 1st Spot After Consecutive 3 Test Defeat in India vs New Zealand
WTC Points Table: भारताने गमावले पहिले स्थान, WTC गुणतालिकेत सलग ३ पराभवांनंतर बसला मोठा धक्का
IND vs NZ India suffered their first-ever home series whitewash in a three-match Test series, losing the third Test at the Wankhede Stadium in Mumbai by 25 runs on Sunday
IND vs NZ : टीम इंडियाचा सलग तिसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव! न्यूझीलंडने व्हाइट वॉश करत भारतात घडवला इतिहास
Virat Kohli Broke Sachin Tendulkar World Record of Most Runs After First 600 Innings in International Cricket
Virat Kohli: ४ धावांवर धावबाद झाल्यानंतरही विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
IND vs NZ India Lost 3 Wickets in Just 9 Balls Yashasvi Jaiswal Bowled Virat Kohli Suicidal Run Out on Day 1 of Mumbai test
IND vs NZ: ९ चेंडूत ३ विकेट्स आणि टीम इंडियाची हाराकिरी, रोहित-विराटने पुन्हा केलं निराश

भारताच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत रविवारी झालेल्या पराभवानंतर भारतीय टेनिस स्टार रोहन बोपण्णाने निवृत्ती जाहीर केली. ४४ वर्षीय बोपण्णा २२ वर्षे भारताकडून खेळत होता. त्याने २००२ मध्ये देशासाठी पदार्पण केले. रविवारी झालेल्या सामन्यात त्यांना गेल मॉनफिल्स आणि एडवर्ड रॉजर व्हॅसेलिन या फ्रेंच जोडीने ५-७, ६-२ ने पराभूत केले. यासह भारतीय जोडी स्पर्धेतून बाहेर पडली.

रोहन बोपण्णा हे ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरी सामन्यांमध्ये अंतिम फेरीत होते. २०१७ मध्ये मिश्र दुहेरीत फ्रेंच ओपन आणि २०२४ मध्ये पुरुष दुहेरीत ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी, बोपण्णाने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते, ज्यामध्ये रोहनने ऋतुजा भोसलेसह मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते.

हेही वाचा – Olympic 2024 Medal Tally: आतापर्यंत कोणत्या देशाने जिंकली सर्वाधिक पदकं? भारत कितव्या स्थानी? जाणून घ्या

Olympic 2024: रोहन बोपण्णाची ऑलिम्पिकमधून निवृत्ती


पहिल्या फेरीतील पराभवानंतर बोपण्णाने निवृत्ती जाहीर केली. “हा देशासाठी निश्चितच माझा शेवटची स्पर्धा असेल. एक खेळाडू म्हणून आतापर्यंत कुठपर्यंत पोहोचलो आहे, हे मला माहिती आहे. जोपर्यंत मी खेळत राहीन तोपर्यंत मी टेनिस खेळण्याचा आनंद घेत राहीन. मी सध्या यशाच्या ज्या पायरीवर आहे, तो एकप्रकारे माझ्यासाठी बोनसचं आहे. मी दोन दशकं भारताचं प्रतिनिधित्व करेन असं कधीच वाटलं नव्हतं. २००२ मध्ये पदार्पण केल्यापासून २२ वर्षांनंतरही भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मला याचा खूप अभिमान आहे.”

हेही वाचा – Manu Bhaker Won 2nd Bronze: मनू भाकेरने ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास, भारतासाठी ‘ही’ कामगिरी करणारी पहिली खेळाडू

जगातील सर्वात सर्वात वयस्कर खेळाडू
बोपण्णा या वर्षी २९ जानेवारी रोजी असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा पुरुष दुहेरी खेळाडू बनला. त्यावेळी बोपण्णा ४३ वर्षांचा होता. वयाच्या ४३ व्या वर्षी, तो जगातील नंबर १ पुरुष दुहेरी जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. सध्या त्याचे एटीपी रँकिंग ४ आहे.