Olympic 2024: ऑलिम्पिक २०२४ साठी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने भारतीय खेळाडूंची यादी जाहीर केली. भारताचा ३० खेळाडूंचा ॲथलेटिक्स संघ पॅरिसला जाणार होता. मात्र, आता ही संख्या २९ वर आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकला जाणाऱ्या संघात गोळाफेक ॲथलीट आभा कठुआचे नाव दिलेले नाही. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन किंवा ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने अद्याप याचे कारणही दिलेले नाही. टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त असल्याने आभाला संघातून वगळण्यात आल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे.

हेही वाचा – Paris 2024 Olympics Schedule: भारताचं संपूर्ण वेळापत्रक, तारीख वेळेसहित कधी होणार हॉकी आणि बॅडमिंटनसहित सर्व खेळांचे सामने

मे महिन्यात झालेल्या फेडरेशन कपमध्ये आभाने १८.४१ मीटर थ्रो करत करून राष्ट्रीय विक्रम केला होता. रोड टू पॅरिस रँकिंगमध्ये ती २१ व्या स्थानावर होती आणि अशा प्रकारे पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरली. मात्र, शेवटच्या क्षणी तिचे नाव काढून टाकण्यात आले आहे. अहवालानुसार, लैंगिक विकास नियमन (DSD) उल्लंघनाच्या फरकामुळे जागतिक ॲथलेटिक्सने आभाला सहभागी होण्यापासून प्रतिबंधित केले आहे.

हेही वाचा – Paris Olympic: २३ सुवर्णपदकं आणि ३९ वर्ल्ड रेकॉर्ड… कोण आहे ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू?

टाईम्स ऑफ इंडियाने एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, आभाचे नाव डोपिंगमुळे नाही तर डीएसडी रेग्युलेशनमुळे काढून टाकण्यात आले आहे. गेल्या वर्षी बँकॉक येथे झालेल्या आशिया चॅम्पियनशिपदरम्यान ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली असेल. त्याच नमुन्यात ट्रेस्ट्रॉनची पातळी वाढलेली असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जागतिक ॲथलेटिक्सने हा निर्णय घेतला आहे.

एएफआयच्या एका अधिकाऱ्याने फक्त सांगितले की महासंघाला याबाबत माहिती नाही. जागतिक ॲथलेटिक्सच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनीही या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला. आभाशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना, अधिकाऱ्याने सांगितले की, ‘जागतिक ॲथलेटिक्सने वैयक्तिक निवड निर्णयांवर विशेष प्रतिक्रिया देत नाही. पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील खुर्शी गावात एका शेतकऱ्याच्या घरी जन्मलेल्या आभाने पाच वर्षांपूर्वी गोळाफेक खेण्यापूर्वी विविध ट्रॅक आणि फील्ड खेळांचा प्रयत्न केला.

Story img Loader