Sachin 50th Birthday: सचिन तेंडुलकरच्या जबरदस्त फलंदाजीचा गोलंदाजांवर धाक असायचा, पण १९९१ मध्ये दिल्ली-मुंबई यांच्यात झालेल्या रणजी सामन्यात सचिनच्या एका जीवघेण्या बाऊन्सर चेंडूने फलंदाजाचे नाक फ्रॅक्चर झाले होते. मास्टर ब्लास्टर’च्या बाऊन्सरने दिल्लीचा फलंदाज बंटू सिंगच्या नाकाला फ्रॅक्चर झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला होता.

बंटूची १९८०-९० च्या दशकात दिल्लीच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जात होती. सचिन तेंडुलकर आज आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी बंटू सिंगने पीटीआयशी बोलताना ३२ वर्षांपूर्वीचा हा किस्सा सांगितला. ही घटना २० एप्रिल १९९१ रोजी घडली होती. त्या काळात मुंबई आणि दिल्ली संघांमध्ये निकराची लढत झाली होती.

Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद

दिल्ली संघाने कोटला येथे गवताळ खेळपट्टी तयार केली होती –

या घटनेबद्दल बोलताना बंटू म्हणाला, “माझ्या नाकाचा नकाशा बदलला आहे, आता मला त्या तेंडुलकरच्या बाऊन्सरनंतर नवे नाक मिळाले आहे. कोटला येथे आम्ही गवताळ खेळपट्टी तयार करण्याचा प्रयत्न केला, ज्यावर चेंडू उसळी घेईल, पण नंतर ती फलंदाजांसाठी स्वर्ग बनली. आमचे वेगवान गोलंदाज संजीव शर्मा आणि अतुल वासन यांनी शेवटचा सीझन खेळत असलेल्या दिलीप भाई (दिलीप वेंगसरकर) यांना काही बाऊन्सर टाकले होते.”

हेही वाचा – Sachin Tendulkar 50th Birthday: सचिनसाठी ‘२४ तारीख’ आहे खूपच खास, लग्न ते अनेक मोठे विक्रम रचलेत याच दिवशी

दिल्लीच्या गोलंदाजांनी दिलीप वेंगसरकरवर बाऊन्सरचा मारा केला –

बंटू म्हणाला, “मला आठवतं की किमान दोन वेळा दिलीपभाईंना अतुलच्या बाऊन्सरचा फटका बसला आणि भांडण सुरू झालं. पहिल्या डावात मुंबईच्या ३९० धावांना प्रत्युत्तर देताना, दिल्लीने उपांत्यपूर्व फेरीत ३८९ धावा केल्यामुळे एका धावेने पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या डावात संजय मांजरेकर, तेंडुलकर आणि चंद्रकांत पंडित यांच्या शतकांच्या जोरावर मुंबईने ७१९ धावा करत सामना जिंकला.

बंटूला कधी दुखापत झाली –

बंटू पुढे म्हणाला, “दुसर्‍या डावात माझ्या नाकाला मार लागला. मी पहिल्या डावात शतक झळकावले आणि फक्त औपचारिकता म्हणून दुसऱ्या डावात मी सचिनला चौकार मारला, पण त्याचा पुढचा चेंडू गवतावरून वेगाने माझ्या दिशेने उसळला, मी पुल शॉट खेळला पण चेंडूने बॅटची कडा घेतली नाकावर येऊन आदळला. दुखापत इतकी गंभीर होती की माझा तोल गेला, मांजरेकर स्लिपमधून माझ्याकडे धावत आले आणि मला पडण्यापासून सावरले. त्यानंतर माझा आणि मांजरेकरचा शर्ट रक्ताने लाल झाला होता.”

हेही वाचा – IPL 2023 CSK vs KKR: ‘धोनी रिव्ह्यू सिस्टीम’ पुन्हा एकदा ठरली सरस, पाहा कसा बदलावा लागला पंचांना निर्णय?

तेंडुलकरने बंटूची विचारपपूस केली होती –

बंटूला कोटलाच्या मागे असलेल्या संजीवन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याच्या नाकात अनेक फ्रॅक्चर झाल्याचे आढळून आले, ज्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. त्याला किमान दोन महिने द्रवपदार्थांचा आहार घ्यावा लागला. मात्र, बंटूला तेंडुलकरची माणुसकी आठवली. तो म्हणाला, “मुंबईचा संघ सामना संपल्यानंतर त्याच संध्याकाळी निघून गेला. रात्री ११ च्या सुमारास आमचा लँडलाईन फोन वाजला आणि माझ्या वडिलांनी उचलला. तेंडुलकर दुसऱ्या बाजूला होता. त्याला माझा फोन नंबर कसा सापडला माहीत नाही. त्यानी माझ्या वडिलांना विचारले, ‘बंटू कसा आहे? डॉक्टर काय म्हणतायत?’’ बंटू म्हणाला, ‘‘पुढे आम्ही भेटायचो तेव्हा तो विचारायचा, ‘तुझे नाक व्यवस्थित आहे ना’.