Mohammad Haris Reaction on Comparison with SuryaSuryakumar Yadav: भारताच्या सूर्यकुमार यादवने सुमारे दोन वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत बरीच उंची गाठली आहे. ३२ वर्षीय ‘सूर्या’ एकदिवसीय आणि टी-२० मध्ये असा फलंदाज म्हणून ओळखला जातो, जो मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात फटके मारण्याण्याची क्षमता राखतो. या कारणास्तव त्याच्याविरुद्ध क्षेत्ररक्षण सेट करणे विरोधी कर्णधारासाठी कठीण काम असल्याचे सिद्ध होते. या गुणवत्तेमुळे सूर्याला दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्ससारखा 360 डिग्री खेळाडू म्हटले जाते.
‘सूर्या’प्रमाणेच पाकिस्तानी फलंदाजही मोहम्मद हॅरीसही आपल्या ‘अभिनव’ फटकेबाजीने क्रिकेटमध्ये ठसा उमटवत आहे. त्यामुळे त्याची तुलना सूर्यकुमार यादवशी केली जात आहे. तो सध्या श्रीलंकेतील एसीसी इमर्जिंग आशिया कपमध्ये पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. २२ वर्षीय मोहम्मद हरीसला त्याच्या गुणवत्तेमुळे ‘पाकिस्तानचा सूर्यकुमार यादव’ असे नाव मिळाले आहे. यावर स्वत: मोहम्मद हॅरीसने प्रतिक्रिया दिली आहे.
हॅरीसने आपली फलंदाजीची शैली आणि भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यांच्याशी केलेल्या तुलनेवर आपली बाजू मांडताना सांगितले की, त्याला 360 डिग्रीचा खेळाडू म्हणून स्वत:चे नाव कमवायचे आहे. त्यामुळे इतर कोणाशीही तुलना करणे योग्य ठरणार नाही. हॅरीस एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर म्हणाला, “आत्ता आमच्यात तुलना होऊ नये. सूर्या ३२ वर्षांचा आहे, तर मी फक्त २२ वर्षांचा आहे. मला अजूनही त्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी खूप काम करायचे आहे. सूर्या कुमारची स्वतःची पातळी आहे, डिव्हिलियर्सची स्वतःची आहे.”
हेही वाचा – बजरंग, विनेशला थेट प्रवेश; आशियाई स्पर्धेसाठी हंगामी समितीचा आश्चर्यकारक निर्णय
मोहम्मद हॅरीस पुढे म्हणाला, माझ्याबद्दल बोलायचे, तर मी माझ्या पातळीवर चांगला आहे. मला 360 डिग्री क्रिकेटर म्हणून माझे नाव करायचे आहे. त्यामुळे मला त्यांचे नाव वापरायचे नाही. त्यांचे स्वतःचे नाव आहे आणि माझेही आहे. जर मी सराव केला, तर मी त्याच्यापेक्षा चांगला होऊ शकतो. जर मी तसे केले नाही, तर मी त्यांच्या पातळीपेक्षा खाली असेन.”
हेही वाचा – बजरंग, विनेशला थेट प्रवेश; आशियाई स्पर्धेसाठी हंगामी समितीचा आश्चर्यकारक निर्णय
मोहम्मद हॅरीसची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी –
मोहम्मद हॅरीसने पाकिस्तान राष्ट्रीय संघासाठी ९ टी-२० आणि ५ एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. राष्ट्रीय संघातून खेळताना त्याची आकडेवारी चांगली नसली, तरी तो संघाचा नियमित खेळाडू आहे. वनडेमध्ये त्याची सरासरी १० पेक्षा कमी आणि टी-२० मध्ये १४ च्या जवळपास आहे. तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील शेवटचा सामना मे २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी हरिसची संघातील निवड निश्चित मानली जात आहे.