ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये पुढील वर्षी होणारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अतिशय रंगतदार होईल आणि त्यामध्ये ऑस्ट्रेलियाला विजेतेपदाची अधिक संधी आहे, असे ज्येष्ठ क्रिकेटपटू व समालोचक रवी शास्त्री यांनी सांगितले.
‘‘ही स्पर्धा कांगारूंच्या घरच्या मैदानावर होणार आहे. तेथील खेळपट्टय़ा व वातावरण त्यांच्या खेळाडूंना अनुकूल असणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकाजिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा अव्वल दर्जाचा संघ म्हणून नावलौकिक मिळविला आहे,’’ असे शास्त्री म्हणाले.
‘‘ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळत आहे, हे लक्षात घेता एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही अशीच फटकेबाजी पाहावयास मिळेल. खेळपट्टी कशीही असली तरी फलंदाज बिनधास्तपणे फटकेबाजी करू लागले आहेत. त्यामुळेच या स्पर्धेतील सामने अतिशय रंजक व चुरशीने खेळले जातील,’’ असे त्यांनी सांगितले.

Story img Loader