Happy Birthday MS Dhoni: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची फॅन फॉलोइंग जगभरात खूप आहे. भारतीय संघाच्या माजी कर्णधाराने आपल्या कॅप्टन्सी दरम्यान अनेक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. महेंद्रसिंग धोनी आज ७ जुलै रोजी त्याचा ४२वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या अगोदर, त्याच्या चाहत्यांनी हैदराबादमध्ये ५२ फूट लांबीचा कट-आउट केला. खरंतर या सगळ्या चाहत्यांना धोनीबद्दलचं प्रेम व्यक्त करायचं होतं.

इंडियन प्रीमियर लीग २०२३च्या फायनलमध्ये, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली, चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव केला आणि पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली. हा अंतिम सामना सर्व चाहत्यांना आवडला आणि त्यांनी धोनीच्या कर्णधारपदाचे कौतुकही केले. हैदराबादमध्ये ५२ फूट लांबीचा कट-आउट लावल्याचा फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे.

Ajit Pawar Sabha Mohol, Ajit Pawar news,
अजित पवारांकडून करमाळ्यात आमदार संजय शिंदे यांचा प्रचार, महायुती धर्माला कोलदांडा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde, Sangola, Shahajibapu Patil,
शहाजीबापू पाटील आमच्या टीमचे ‘धोनी’! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक
MS Dhoni and wife Sakshi casting vote in Ranchi reaches new heights crowd Craze to capture video
MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने पत्नी साक्षीसह रांचीमध्ये केले मतदान, चाहत्यांच्या गर्दीने घेरल्याचा VIDEO व्हायरल
Dharavi Assembly Constituency election Dharavi Redevelopment Mumbai print news
‘धारावी बचाव’चा कार्यकर्ता रिंगणात; मतदारसंघातून गायकवाड कुटुंबाची मक्तेदारी मोडीत काढणार ?
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
Prithvi Shaw Dance Video Viral of his 25th Birthday Party Trolled for Disciplinary Issues in Ranji Trophy
Prithvi Shaw: पृथ्वी शॉचा वाढदिवसाच्या पार्टीत ‘तांबडी चामडी’ गाण्यावर भन्नाट डान्स, सोशल मीडियावर होतोय ट्रोल, VIDEO व्हायरल

इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये महेंद्रसिंग धोनीची जादू दिसून आली

इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये एक खास गोष्ट पाहायला मिळाली. ‘थाला’च्या चाहत्यांनी धोनीची साथ सोडली नाही आणि चेन्नई सुपर किंग्जच्या प्रत्येक सामन्याला जल्लोष करण्यासाठी सर्वत्र हजर होते. महेंद्रसिंग धोनीने या मोसमात फारशी फलंदाजी केली नाही पण जेव्हा तो फलंदाजीसाठी मैदानात उतरायचा तेव्हा चाहत्यांमध्ये उत्साह दिसत होता.

हेही वाचा: MS Dhoni Birthday: BCCIला धोनीसाठी हा ‘नियम’ तोडावा लागला, वयाच्या २३व्या वर्षी पाकिस्तानला दाखवले अस्मान

महेंद्रसिंग धोनीचे हे शेवटचे आयपीएल असू शकते असे अनेकांना वाटत होते पण चाहत्यांचे प्रेम पाहता तो पुढील सीझनमध्येही खेळताना दिसणार असल्याचे त्याने स्वतः स्पष्ट केले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००७ टी२० विश्वचषक, २०११ एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. महेंद्रसिंग धोनीची गणना जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये केली जाते. आता सर्व चाहत्यांना त्याला पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये खेळताना पाहायला आवडेल.

विशेष म्हणजे हा धोनीचा कारकिर्दीतील ३५०वा वन डे सामना होता. त्यामुळे तो ३५० वन डे सामने खेळणारा जगातील केवळ दुसरा यष्टीरक्षक ठरला होता. याआधी श्रीलंकेचा माजी दिग्गज यष्टीरक्षक कुमार संगकाराने ३६० वन डे सामने यष्टीरक्षक म्हणून खेळला आहे. विशेष म्हणजे संगकाराने त्याच्या कारकिर्दीत एकून ४०४ वन डे सामने खेळले आहेत. पण त्याने यातील ४४  सामने केवळ फलंदाज म्हणून खेळले आहेत.

त्याचबरोबर धोनी ३५० वन डे खेळणारा एकूण १०वा क्रिकेटपटू तर भारताचा केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकरने भारताकडून ३५० पेक्षा अधिक वन डे सामने खेळले आहेत. सचिनने ४६३ वन डे सामने खेळले आहेत. धोनीने ३५० वन डे सामन्यांपैकी ३ सामने आशिया एकादश संघाकडून खेळले आहेत. तसेच, त्याने भारताकडून ३४७ वन डे सामने खेळले आहेत.

हेही वाचा: MS Dhoni Birthday: आपला माही ४२ वर्षांचा झाला! कॅप्टन कूलपासून ते निवृत्तीपर्यंत जाणून घ्या त्याचा जीवनप्रवास

वन डेत सर्वाधिक सामने पुर्णवेळ यष्टीरक्षक म्हणून खेळणारे खेळाडू-

३६० – कुमार संगकारा

३५० – एम.एस. धोनी

२९४ – मार्क बाऊचर

२८२ – एडम गिलख्रिस्ट

२११- मोईन खान