Kapil Dev on Asia Cup Team Selection: आशिया कपसाठी टीम इंडियाची तयारी सुरू झाली आहे, गुरुवारपासून एनसीएमध्ये सराव शिबिर सुरू झाले आहे. दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर असलेले श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. पण माजी कर्णधार कपिल देव यांनी आशिया चषकासाठी खेळाडू निवडले गेलेल्या खेळाडूंना पुन्हा दुखापत झाल्यास ऐन विश्वचषकाच्या तोंडावर मोठे नुकसान होईल, चिंता व्यक्त केली आहे. या परिस्थितीत, विश्वचषक संघात स्थान मिळवण्यास उत्सुक असलेल्या इतर खेळाडूंवर अन्याय होईल, असेही ते म्हणाले.

बीसीसीआयने आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. राहुल आणि अय्यरच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाची फलंदाजी मजबूत दिसत आहे. जरी राहुल सलामीच्या सामन्यातून बाहेर राहणार असला तरी अजित आगरकरने याला आधीच दुजोरा दिला आहे. १९८३ मध्ये टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार कपिल देव यांच्या मते, “विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी प्रत्येक खेळाडूची फिटनेस टेस्ट घेतली पाहिजे.”

wardha Aam Aadmi Party which helped Amar Kale win taken candidate wise stance now
आघाडीस धक्का! ‘ आप ‘चा दोन ठिकाणी आघाडीस तर दोन ठिकाणी अपक्षास पाठिंबा.
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
sreeleela doing item song in pushpa 2 movie
श्रद्धा कपूरने नाकारली ‘पुष्पा २’ ची ऑफर, आता ‘ही’ अभिनेत्री करणार अल्लू अर्जुनबरोबर आयटम साँग; घेतलं ‘इतकं’ मानधन
Virat Kohli comes now it seems like he can be dismissed without any issues says Aakash Chopra
Virat Kohli : ‘आता असं वाटतं की विराटला कोणत्याही अडचणीशिवाय…’, भारताच्या रनमशीनबद्दल आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य
Raigad, Dilip Bhoir expelled from BJP, Dilip Bhoir,
रायगड : दिलीप भोईर यांची भाजपातून हकालपट्टी
raj thackeray sada sarvankar Amit Thackeray
“सरवणकरांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती कधीच केली नाही”, मनसेचा चिमटा; म्हणाले, “त्यांचे दोन्ही पाय…”
How India lost in Test matches against New Zealand Where exactly did the Indian team go wrong
रोहित, विराट सुमार; युवकांतही सातत्याचा अभाव! भारतीय संघाचे नेमके चुकले कुठे?ऑस्ट्रेलियाविरुद्ध कितपत सज्ज?
Rohit Sharma Statement Rishabh Pant Controversial Wicket in IND vs NZ Mumbai test said The bat was close to the pads
IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?

हेही वाचा: Asia Cup: आशिया चषकासाठी निवडलेल्या भारतीय संघाबाबत सौरव गांगुलीचे सूचक वक्तव्य, म्हणाला, “यापेक्षा चांगल्या…”

कपिल देव यांनी एबीसीला सांगितले की, “विश्वचषक जवळ आला आहे, त्याआधी प्रत्येक खेळाडूची चाचणी घेतली पाहिजे. पण तुम्ही अजून सर्व खेळाडूंना संधी दिलीच नाही. तो वर्ल्डकपसाठी गेला आणि नंतर जखमी झाला तर? यामुळे संघाचे नुकसान होईल. आशिया चषकात त्याला फलंदाजी आणि गोलंदाजीची संधी मिळेल, त्याची लय शोधण्याची ही योग्य वेळ आहे. जर ते दोघेही फिट असतील तरच वर्ल्ड कप त्यांना खेळू द्या, अन्यथा दुसऱ्या खेळाडूचे नुकसान करू नका.”

कपिल देव यांच्या मते, विश्वचषकादरम्यान खेळाडूंना दुखापत झाल्यास भारतासाठी ती सर्वात वाईट परिस्थिती असेल, ज्यामुळे इतर खेळाडू संघात येऊ शकत नाहीत. कपिल देव पुढे म्हणाले, “दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना संधी द्यायला हवी. तो तंदुरुस्त राहिल्यास विश्वचषकात जाऊ शकतो. खेळाडूंमध्ये टॅलेंटची कमतरता नाही पण जर खेळाडू तंदुरुस्त नसतील तर वर्ल्डकपसाठी बदल करण्याची संधी मिळेल.”

हेही वाचा: World Cup 2023: वर्ल्डकप तिकिटांबाबत मोठी अपडेट! २४ ऑगस्टपासून विक्री सुरू, कुठे खरेदी करायची? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आशिया चषक ही विश्वचषकासाठी संघ बनवण्याची चांगली संधी आहे – कपिल देव

कपिल पाजी पुढे म्हणाले, “आशिया कप हे एक चांगले व्यासपीठ आहे आणि तुम्हाला विश्वचषक स्पर्धेसाठी संघ बनवण्याची उत्तम संधी आहे. मला खेळाडूने स्वत:ला या आशिया चषकात सिद्ध करून दाखवावे. पण जर काही शंका, प्रश्न असतील तर तुम्हाला वर्ल्डकपमध्ये असण्याची गरज नाही. जर तुम्ही त्याला संधी दिली नाही तर ते केवळ खेळाडूंवरच नव्हे तर निवडकर्त्यांवरही अन्यायकारक ठरेल. मला माहित आहे की विश्वचषक भारतात होणार आहे पण तुम्हाला सर्वोत्तम आणि योग्य संघ निवडायचा आहे. त्यामुळे सर्वांना संधी दिली गेलीच पाहिजे.”