भारतामध्ये फुटबॉलप्रेमी राज्यांपैकी सर्वात आघाडीला असलेला राज्य म्हणजे केरळ. जगजेतेपदावर नाव कोरणाऱ्या अर्जेंटिना संघाचा सर्वात मोठं समर्थक राज्य म्हणूनही केरळला ओळखलं जातं. अर्जेंटिना अंतिम सामन्यात पोहचल्यापासूनच केरळमध्ये जोरदार उत्साह दिसून येत होता. त्यामुळेच अर्जेंटिनाचा कर्णधार आणि फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर केरळमध्ये अनेक ठिकाणी मोठा जल्लोष करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेसीचा अंतिम विश्वचषक सामना असलेल्या फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने ४-२ ने विजय मिळवला. या विजयाबरोबरच ३६ वर्षांचा विश्वचषक विजयाचा दुष्काळ अर्जेंटिनाने संपुष्टात आणला. या विजयानंतर केरळमध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. १८ तारखेच्या रात्री केरळमध्ये एखाद्या सणासुदीप्रमाणे फटाके फोडून, वाद्य वाजवून जल्लोष करण्यात आला. रस्त्यांवर उतरुन अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी विजयाचा आनंद साजरा केला.

मात्र या जल्लोषादरम्यान एक गोष्ट प्राकर्षाने समोर आली ती म्हणजे अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स सामन्याच्या सायंकाळी केरळमध्ये मद्यालाही मोठी मागणी होती. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रविवारी केरळमध्ये ४९ कोटी ४० लाख रुपये किंमतीचं मद्य विकलं गेलं. सरासरी मद्यविक्रीपेक्षा ही रक्कम फारच जास्त आहे. सामान्यपणे केरळमध्ये दर रविवारी ३५ कोटी रुपयांची दारु विकली जाते. सामान्यपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात केरळमध्ये ओनम किंवा नाताळ किंवा नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मद्यविक्री होते.

नक्की वाचा >> अर्जेंटिना FIFA World Cup जिंकला अन् तिने मैदानात कॅमेरासमोरच टॉप काढला; Video Viral झाल्यानंतर…

रविवारी केरळ राज्य सरकारच्या मालकीच्या केरळ स्टेट ब्रेव्हेजर्स कॉर्परेशनच्या (बीईव्हीको) दोन केंद्रांवर ४० लाखांहून अधिकची मद्यविक्री झाली. मल्लपूरम जिल्ह्यामधील तिरुरमधील बीईव्हीकोच्या केंद्रावर सर्वाधिक मद्यविक्री झाली. या केंद्रातून ४५ लाखांची दारु एका दिवसात विकली गेली. त्या खालोखाल वाय्यनाडमधील बीईव्हीकोच्या केंद्रावर ४३ लाखांची मद्यविक्री झाली. याशिवाय राज्यातील लहान-मोठ्या बारमध्ये सहा कोटींहून अधिक किंमतीचं मद्य विक्रीसाठी उपलब्ध करुन दिलेलं. या सर्व मद्याची एकंदरित किंमत ही ५६ कोटींपर्यंत जाते.

नक्की वाचा >> Argentina Wins World Cup: मेस्सीचा खेळ पाहून पंतप्रधान मोदीही झाले प्रभावित; म्हणाले, “हा सामना फुटबॉलच्या इतिहासातील…”

केरळमधील ३ कोटी ३४ लाख लोकसंख्येपैकी ३२ लाख ९० हजार लोक मद्यप्राशन करतात. यापैकी २९ लाख ८० हजार पुरुष आणि ३ लाख १० हजार स्त्रीयांचा समावेश आहे. यापैकी पाच लाख लोकांनी दररोज मद्यप्राशन करत असल्याचं सांगितलं. यातील ८३ हजार ८५१ पुरुष आणि एक हजार ४३ महिला होत्या. शनिवारीच केरळमधील मद्याची किंमत २० रुपयांनी वाढवण्यात आली होती. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी ‘केरळ जनरल सेल्स टॅक्स (अमेंडमेंट) बील’ कायद्याला मान्यता दिल्यानंतर मद्याच्या किंमती ४ टक्क्यांनी वाढल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the day of fifa world cup final football crazy kerala drank liquor worth rs 56 crores scsg