India vs England First Test 3rd Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबाद येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत दुसऱ्या डावात भारताविरुद्ध १२६ धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लिश संघाने दुसऱ्या डावात सहा गडी गमावून ३१६ धावा केल्या होत्या. उपकर्णधार ऑली पोपने जबरदस्त खेळी करत शतक झळकावले आणि तो नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने २०८ चेंडूचा सामना करताना १४८ धावांवर नाबाद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फॉक्स आणि पोप यांच्यात शतकी भागीदारी –

ओली पोपने आक्रमक फलंदाजी करताना आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने यष्टीरक्षक फलंदाज बेन फॉक्ससोबत सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारीही केली. या भागीदारीने भारतीय गोलंदाजांवर दबाव आणला. मात्र, अक्षर पटेलने फॉक्सच्या विकेटने ही भागीदारी तोडली. बेन फॉक्स ३४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पोपने २०८ चेंडूत १७ चौकारांच्या मदतीने नाबाद १४८ धावा केल्या आहेत. यादरम्यान रेहान अहमदने त्याला साथ दिली आणि ३१ चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने नाबाद १६ धावा केल्या. ऑली पोपचे शतक इंग्लंडसाठी संजीवनी ठरले. पोपच्या शतकापूर्वी इंग्लंडचा संघ जवळपास सामन्यातून बाहेर पडला होता, मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे.

भारताने घेतली होती १९० धावांची आघाडी –

भारताने तिसऱ्या दिवसाची सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या तीन विकेट्स शिल्लक होत्या. पण यजमान संघाला तीन विकेटचा योग्य वापर करता आला नाही. म्हणजेच तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने ३ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १४ धावा केल्या होत्या. यादरम्यान जो रूटने रवींद्र जडेजा आणि बुमराहला बाद केले. तर रेहान अहमदने अक्षर पटेलला आपल्या जाळ्यात अडकवले. डावाच्या अखेरीस भारताने १९० धावांची आघाडी मिळवली होती.

हेही वाचा – Ranji Trophy 2024 : दिल्लीवर भेदभाव केल्याचा आरोप, क्षितिजसाठी बदोनीला वगळले, धडा शिकवण्यासाठी कापली मॅच फी

टीम इंडियाने पहिल्या डावात ४३६ धावा केल्या. पहिल्या डावाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध १९० धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ८७ धावा केल्या. रवींद्र जडेजाशिवाय केएल राहुलने ८६ धावांची आणि यशस्वी जैस्वालने ८० धावांची खेळी खेळली. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत. टॉम हार्टले आणि रेहान अहमदने २-२ विकेट्स घेतल्या. जॅक लीचने एक विकेट घेतली. तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात इंग्लंडला २४६ धावांत गुंडाळले होते.

हेही वाचा – Shoaib Malik : ‘प्रत्येकाने कोणत्याही…’, मॅच फिक्सिंगच्या आरोपांवर शोएबने सोडलं मौन, सोशल मीडियावर दिली प्रतिक्रिया

पहिल्या डावात फलंदाजीला उतरतलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८० धावा (७५ चेंडू) जोडल्या, त्यानंतर रोहित शर्मा (२४) तेराव्या षटकात जॅक लीचच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर शतकाकडे वाटचाल करणारा यशस्वी जैस्वाल २४व्या षटकात जो रूटचा बळी ठरल्याने डाव काही काळ स्थिरावला होता. जैस्वालने वेगवान फलंदाजी करत ७४ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८० धावा केल्या.


मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the strength of olly popes century england scored 311 runs in the second innings and took a lead of 126 runs against ind vbm
Show comments