IND vs AUS 4th Test Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफी २०२३ मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये होता, परंतु अवघ्या १४ धावांनी त्याचे द्विशतक हुकले. त्याने ३६४ धावांत १८६ धावा केल्या. त्याचबरोबर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या ४८० धावांना प्रत्युत्तर देताना ५७१ धावा केल्या. तसेच टीम इंडियाने पहिल्या डावाच्या जोरावर आता ९१ धावांची आघाडी घेतली आहे.
भारताचा पहिला डाव –
भारताने पहिल्या डावात ५७१ धावा केल्या आहेत. यासह टीम इंडियाने ९१ धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक १८६ धावा केल्या. त्याचवेळी शुबमन गिलने १२८ धावांची खेळी केली. अक्षर पटेलनेही ७९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. या डावात भारताच्या नऊ विकेट पडल्या, पण श्रेयस अय्यर दुखापतीमुळे फलंदाजीला येऊ शकला नाही. त्यामुळे भारताचा डाव नऊ विकेट्सवर संपला.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव –
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी ४८० धावांचा डोंगर उभारला. एवढे मोठे आव्हान उभे करताना त्यांच्या दोन खेळाडूंनी शतक साजरे केले. त्यात उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन यांचा समावेश आहे. ख्वाजाने ४२२ चेंडू खेळून १८० धावा चोपल्या. त्यात २१ चौकारांचाही समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त ग्रीनने १७० चेंडू खेळून ११४ धावा केल्या. या धावा करताना त्याने १८ चौकार मारले.
बऱ्याच दिवसांपासून विराट कोहलीचे कसोटीमध्ये शतक आले नव्हते. तब्बल नोव्हेंबर २०१९ नंतर विराटच्या शतकासाठी त्याचे चाहते त्याच्या शतकी खेळीसाठी आसुलेले होते. आज बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटीत त्याने दाखवून त्याने मी अजूनही ‘किंग कोहली’च आहे. त्याने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील ७५वे शतक असून कसोटीतील त्याचे २८वे आहे. त्याने त्याच्या शतकी खेळीत केवळ ५ चौकाराचा समावेश असून बाकी सर्व धावा त्याने पळून काढल्या. २४१ चेंडूत शतक साजरे केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सगळ्या प्रकारात त्याचे १६वे शतक असून कसोटीमध्ये ८वे आहे.