One day Shubman Gill might lead India in all three formats : टीम इंडिया सोमवारी श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेसाठी रवाना झाली आहे. शुबमन गिल हा सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम आणि परिपूर्ण फलंदाजांपैकी एक मानला जातो. पाच वर्षांपूर्वी भारताकडून पदार्पण केल्यापासून तो संघाच्या फलंदाजीचा एक महत्त्वाचा सदस्य बनला आहे. तो सध्या भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो आणि श्रीलंका दौऱ्यावर त्याला वनडे आणि टी-२० मालिकेसाठी उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अशात भारताच्या माजी खेळाडूने शुबमन गिलबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.
झिम्बाब्वे मालिकेनंतर गिलची आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यात भारताला तीन टी-२० आणि तितकेच एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. त्तत्पूर्वी भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी शुबमन गिल एक दिवस सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
विक्रम राठोड शुबमन गिलबद्दल काय म्हणाले?
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना विक्रम राठोड म्हणाले, ‘मी त्याला जे काही करताना पाहिले आहे, मग ते गुजरात टायटन्ससाठी असो किंवा झिम्बाब्वेमध्ये असो, त्याने चांगले काम केले आहे. त्याने उत्कृष्ट देहबोली दाखवली आहे, जी संघाचे नेतृत्व करताना आवश्यक असते. आता उपकर्णधारपदासह बीसीसीआयने त्याला अतिरिक्त जबाबदारी दिली आहे आणि मला खात्री आहे की तो या भूमिकेत यशस्वी होईल.’
‘कर्णधारपदामुळे विराट-रोहितमधील सर्वोत्तम गोष्टी समोर आल्या’
विक्रम राठोड पुढे म्हणाले, ‘मला वाटते कर्णधारपदामुळे विराट आणि रोहितमधील सर्वोत्तम गोष्टी समोर आल्या. आता शुबमनच्या बाबतीतही असेच घडेल. मात्र, तो अद्याप कर्णधार नाही. नेतृत्व गटात राहिल्याने त्याला सर्वोत्तम कामगिरी करता येईल. मला याची पूर्ण खात्री आहे. जेव्हा तुम्ही त्या भूमिकेत असता, इतरांचे नेतृत्व करता तेव्हा ते तुम्हाला अतिरिक्त जबाबदारी देते, जे चांगले आहे. मला वाटते की शुबमनसारख्या तरुणांसाठी चांगली गोष्ट आहे, जो एक दिवस तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करताना दिसेल.’
हेही वाचा – IND vs SL : हार्दिक पंड्याने सूर्यकुमार यादवला ‘जादू की झप्पी’ देत वेधले सर्वांचे लक्ष, VIDEO होतोय व्हायरल
टीम इंडियाचे श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक –
पहिला टी-२० सामना, २७ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार), पल्लेकेले स्टेडियम
दुसरा २० सामना, २८ जुलै, संध्याकाळी ७ वाजता, पल्लेकेले स्टेडियम
तिसरा टी-२० सामना, ३० जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता, पल्लेकेले स्टेडियम
पहिला एकदिवसीय सामना, २ ऑगस्ट, दुपारी २.३० वाजता, कोलंबो
दुसरा एकदिवसीय सामना, ४ ऑगस्ट, दुपारी २.३० वाजता, कोलंबो
तिसरा एकदिवसीय सामना, ७ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता, कोलंबो