डय़ुरंड चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत ओएनजीसी आणि मोहम्मेडन स्पोर्टिग यांच्यात अंतिम मुकाबला रंगणार आहे. गुरुवारी कृत्रिम प्रकाशात ही लढत होणार आहे. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत ओएनजीसीने नौदलावर १-० अशी मात केली. हेन्री इझेहच्या एकमेव गोलने ओएनजीसीला विजय मिळवून दिला. नौदलाने चेंडूवर नियंत्रण राखले, मात्र गोल करण्यात त्यांना अपयश आले. ओएनजीसीने नायजेरियाच्या हेन्री इझेहच्या गोल करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि त्याने हा विश्वास सार्थ ठरवला. लॅव्हिनो फर्नाडिझच्या क्रॉसवर ५३व्या मिनिटाला इझेहने सुरेख गोल केला. ७९व्या मिनिटाला ओएनजीसीचा बचावपटू करण अटवालला रेड कार्ड दाखवण्यात आले.

Story img Loader