उत्तेजकांचे सेवन केल्याचे सिद्ध झाल्यानंतर लान्स आर्मस्ट्राँगची प्रतिष्ठेच्या ‘टूर डी फ्रान्स’ सायकल शर्यतीची जेतेपदे काढून घेण्यात आली. आतापर्यंत आर्मस्ट्राँगने उत्तेजकांचे सेवन केल्याचे मान्य केलेले नाही. मात्र येत्या काही दिवसांतच आर्मस्ट्राँग अमेरिकेतील प्रसिद्ध मुलाखतकार ऑप्रा विन्फ्रेच्या कार्यक्रमादरम्यान आपल्या कृष्णकृत्यांची कबुली देण्याची शक्यता आहे. एका विशेष भागामध्ये आपण अधिकाऱ्यांना, खेळाडूंना कसे फसवले याबद्दल आर्मस्ट्राँग बोलण्याची अपेक्षा आहे. अमेरिकन उत्तेजक विरोधी संघटना अर्थात ‘यूएसएडीए’ने आर्मस्ट्राँगवर आजीवन बंदीसह जेतेपदे काढून घेतल्यानंतरची आर्मस्ट्राँगची ही पहिलीच जाहीर मुलाखत असणार आहे.
ऑप्राच्या कार्यक्रमात आर्मस्ट्राँग देणार चुकीची कबुली
उत्तेजकांचे सेवन केल्याचे सिद्ध झाल्यानंतर लान्स आर्मस्ट्राँगची प्रतिष्ठेच्या ‘टूर डी फ्रान्स’ सायकल शर्यतीची जेतेपदे काढून घेण्यात आली. आतापर्यंत आर्मस्ट्राँगने उत्तेजकांचे सेवन केल्याचे मान्य केलेले नाही.
First published on: 10-01-2013 at 04:50 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oprah winfrey interviews lance armstron