करोनाच्या भीतीपोटी सध्या जगभरातील बहुतांश देशात लॉकडाउन सुरू आहे. करोनामुळे भारतातील सर्वात लोकप्रिय IPL स्पर्धा देखील लांबणीवर टाकण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू सध्या आपापल्या घरीच आहेत. काही लोक पूर्णपणे आराम करत आहेत. काही क्रिकेटपटू लाइव्ह चॅटमध्ये व्यस्त आहेत. काही क्रिकेटपटू टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. इंग्लंडच्या एका माजी क्रिकेटपटूने स्वत:चा लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे, पण मजेदार गोष्ट म्हणजे त्या फोटोवरून तोच स्वत: ट्रोल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विराटवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही – डीव्हिलियर्स

इंग्लंडचा मधल्या फळीतील माजी दमदार फलंदाज रवी बोपारा याने त्याच्या शालेय काळातील एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोत तो त्याच्या क्रिकेट संघासोबत पोझ देऊन उभा आहे. संघातील सर्व क्रिकेटपटूंमध्ये तोच एकटा थोडासा लठ्ठ दिसतो आहे. त्यामुळे त्याने फोटोच्यावर कॅप्शनमध्ये ‘पाहा, मी आधी किती लठ्ठ होतो’ असं लिहिलं आहे.

IPL Flashback : रसलने आजच ठोकल्या होत्या ४० चेंडूत ८० धावा, पाहा VIDEO

पाहा फोटो –

त्या फोटोवरून काही माजी क्रिकेटपटूंनी त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगाकारा याने ‘तू अजूनही लठ्ठच आहेस’, अशी कमेंट केली आहे. त्यावर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन यानेही त्याच्या कमेंटला दुजोरा दिला आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी या दोघांनी देखील त्याला ट्रोल केले आहे.

पण, या सर्व कमेंटमध्ये इंग्लंडची माजी महिला क्रिकेटपटू आणि सध्या समालोचन क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी इशा गुहा हिची कमेंट चांगलीच भाव खाऊन गेली आहे.

याशिवाय, इतरही अनेक चाहत्यांनी बोपाराच्या फोटोवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.