India vs Pakistan, Asia Cup 2023: भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचे मत आहे की, पाकिस्तानच्या ताफ्यात चांगल्या गोलंदाजांचा भरणा आहे. २ सप्टेंबर रोजी झालेल्या भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ आणि नसीम शाह यांनी धोकादायक गोलंदाजी केली होती. जिथे तिन्ही गोलंदाजांनी अनुक्रमे ४,३,३ विकेट्स घेतल्या. आता १० सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान विरुद्ध सुपर ४ सामना होणार आहे. त्याआधी राठोड यांनी पाकिस्तानी गोलंदाजांना इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी नेपाळविरुद्धच्या भारताच्या विजयानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांबाबत सूचक भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ” आमचे बॅट्समन धावा काढत असून एकच घटना सारखी-सारखी होत नाही. पाकिस्तानकडे चांगले गोलंदाजी आक्रमण आहे आणि काही दिवसातच त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र, प्रत्येकवेळी त्यांचाच वरचष्मा असेल असे नाही. जेव्हा आम्ही चांगली सुरुवात करतो तेव्हा आमचे फलंदाज मोठी धावसंख्या करू शकतात.”

हेही वाचा: IND vs PAK: भारत-पाक सामना धोक्यात? सुपर-४ सामन्यांचे ठिकाण न बदलल्याबद्दल PCBने जय शाहांना केलं लक्ष्य; म्हणाले, “भारत घाबरतो…”

राठोड पुढे म्हणाले, “आम्ही सुपर ४ सामन्यात चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. गेल्या सामन्यात हवामान, खेळपट्टी आणि परिस्थिती वेगळी होती. असे नाही की आम्ही पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांसमोर खेळू शकत नाही. याआधीही आम्ही चांगली फलंदाजी केलेली आहे. सगळे दिवस हे सारखे नसतात. क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे, यात कधी कोणाचे पारडे जड असेल काही सांगता येत नाही.” स्टार स्पोर्ट्सशी बोलताना त्यांनी आपले मत मांडले.

२ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या आणि इशान किशनने शानदार फलंदाजी केली. पहिल्या दोन सामन्यांसाठी बाहेर असलेला के.एल. राहुलही श्रीलंकेत पोहोचला आहे. आता पाकिस्तानविरुद्धच्या सुपर ४ सामन्यात इशान किशन आणि के.एल. राहुल यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा: PAK vs BAN: पाकिस्तानला मोठा धक्का! बाबरच्या चितेत वाढ, वेगवान गोलंदाज नसीम शाह भारताविरुद्धच्या सुपर-४ सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त

राठोड म्हणाले, “इशानने पाकिस्तानविरुद्ध शानदार फलंदाजी केली. राहुलनेही गेल्या दोन वर्षांत संघासाठी अनेकदा चांगली कामगिरी केली आहे. होय, एक चांगली बाब आहे… आमच्याकडे निवडण्यासाठी दोन खूप उत्तम खेळाडू आहेत.” ते पुढे म्हणाले, “शार्दुलमुळे संघाला बॅटिंगमध्ये डेप्थ मिळते आणि तो गोलंदाजीही करतो. शमी चांगला गोलंदाज आहे पण त्याची संघात निवड झाल्यास त्याचा आमच्या फलंदाजीवर थोडासा परिणाम होईल. मात्र, असे काही सामने असतील ज्यात आम्हाला गोलंदाज अधिक घ्यावे लागतील.” भारताचा सुपर ४मध्ये पाकिस्तान विरुद्धचा सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर १० तारखेला होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Our batsmen are capable of scoring big statement of indian batting coach vikram rathore on the clash with pak bowlers avw
Show comments