आयसीसी चॅम्पियन्स करंडक मालिकेत इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा दहा धावांनी पराभव झाला आणि संघाचा कर्णधार ब्रेन्डन मॅक्क्युलमने पराभवाचे खापर संघाच्या फलंदाजांवर फोडले. ” आमची फलंदाजी खराब झाली. हा सामना आमच्यासाठी अतिशय महत्वाचा होता, पण आम्ही अपयशी ठरलो.” असे ब्रेन्डन मॅक्क्युलमने सामना झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
या पराभवामुळे न्यझीलंड संघाच्या चॅम्पियन्स करंडक मालिकेच्या उपांत्य फेरीत खेळण्याच्या आशा मावळल्या आहेत. सामन्यात न्यूझीलंडचा निम्मा संघ केवळ ६२ धावांवर तंबूत परतला होता. केन विलिम्नियसच्या ५४ चेंडूत ६७ धावा आणि अँडरसनच्या ७३ धावांच्या जोरावर संघाच्या धावसंख्येला आकार मिळाला. परंतु, अखेरीस इंग्लंडने सामना जिंकला. “आमच्या फलंदाजांना भरपूर मेहनत करावी लागणार आहे. फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने संघावर दबाव वाढला होता. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.” असेही मॅक्क्युलमने स्पष्ट केले.