IND vs AUS Rohit Sharma reaction on Bumrah-Konstas controversy : ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू सॅम कॉन्स्टासने बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत भारताविरुद्ध पदार्पण केले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिला सामना मेलबर्नमध्ये खेळला. तेव्हापासून तो चर्चेत आहे. शेवटच्या कसोटीत विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्यात झालेल्या संघर्षामुळे तो भारतीय चाहत्यांच्या नजरेत खलनायक ठरला. आता सिडनीमध्येही त्याने बुमराहशी वाद घातला. या दोघांमधील जोरदार वादावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्मा काय म्हणाला?

अनावश्यक संभाषण आणि छेडछाड टाळली पाहिजे आणि खेळाडूंनी खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे रोहितचे मत आहे. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी बुमराह आणि कॉन्स्टासमध्ये अनेकवेळा शाब्दिक युद्ध झाले. कॉन्स्टासने बुमराहविरुद्ध आक्रमक वृत्ती स्वीकारून अनेकवेळा त्याचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून बुमराहनेही कॉन्स्टासवर अनेकवेळा दडपण आणले. सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशीचा खेळ संपण्यापूर्वीच दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. पुढच्याच चेंडूवर बुमराहने उस्मान ख्वाजाची विकेट घेत कॉन्स्टासला शांत केले.

आमचे खेळाडू शांत राहतात –

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “आमचे मुलं शांत राहतात, जोपर्यंत त्यांना कोणी चिथावणी देत नाही. तुम्ही त्यांना सतत चिडवत राहिल्यास कोणीही शांत राहू शकत नाही. क्रिकेट खेळा, या फालतूच्या गोष्टी, बोल बच्चन करणे, शोभा देत नाही. आमचे मुलं क्लासिक आहे. आम्ही आमच्या कामावर लक्ष केंद्रित करतो आणि त्यासाठी काम करतो.”

हेही वाचा – IND vs AUS : यशस्वी जैस्वालची कसोटीत टी-२० शैलीत फटकेबाजी! मिचेल स्टार्कला फोडला घाम, VIDEO व्हायरल

बुमराह अतिशय क्लासिक गोलंदाज –

या काळात रोहितने बुमराहचेही खूप कौतुक केले. तो म्हणाला की, “बुमराह अतिशय क्लासिक गोलंदाज आहे. तो म्हणाला, “ज्या प्रकारे तो चेंडूने मानके ठरवतो, तो पूर्णपणे क्लासिक आहे. २०१३ मध्ये जेव्हापासून मी त्याला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हापासून त्याचा आलेख उंचावला आहे आणि तो मजबूत होत आहे.” दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराजच्या चेंडूवर २३ धावा करून कॉन्स्टास बाद झाला. भारतीय संघाला अनावश्यक वाद टाळायचे आहेत आणि मैदानावर आपली सर्वोत्तम कामगिरी करायची आहे, हे रोहित शर्माच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Our boys are calm rohit sharma reaction on jasprit bumrah and sam konstas controversy during ind vs aus 5th tes vbm