मुंबई क्रिकेट मंडळाच्या(एमसीए) ज्युनिअर संघ निवड समितीने जाहीर केलेल्या चौदा वर्षाखालील संघाच्या संभाव्य तीस खेळाडूंच्या यादीत अर्जुन तेंडुलकरला वगळण्यात आलेले आहे. संघनिवड समितीने घेतलेल्या निवड चाचणीत व सामन्यात खराब कामगिरी केल्यामुळे ज्युनिअर तेंडुलकरला चौदा वर्षाखालील संघात स्थान मिळविता आले नाही.
एमसीएच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुनची कामगिरी निराशाजनक राहीली आहे. त्यामुळे त्याचा चौदा वर्षाखालील संघाच्या संभाव्य यादीत समावेश करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अर्जुनला पुढच्यावेळेस चांगली कामगिरी करुन आपले कसब सिद्ध करावे लागेल. असेही एमसीए अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले आहे.
यावेळीच्या एमसीएने भरविलेल्या ‘समर कॅम्प’ सामन्यांमध्ये अर्जुनने एकाही सामन्यात अर्धशतकाचा पल्ला गाठलेला नाही. त्यानंतर निवड समितीने पुन्हा एकदा मुलुंड जिमखाना येथे घेतलेल्या सराव सामन्यांतही अर्जुनने निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे त्याला आपले स्थान गमवावे लागले आहे.

Story img Loader