इंडोनेशिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धा
गेल्याच आठवडय़ात मकाऊ खुल्या ग्रां. प्रि. गोल्ड स्पध्रेचे विजेतेपद पटकावणाऱ्या अग्रमानांकित पी. व्ही. सिंधूचे इंडोनेशिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेच्या तिसरी फेरीत आव्हान संपुष्टात आले. पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीतील नवव्या स्थानावरील श्रीकांतने उपांत्य फेरी गाठली आहे, तर आठवा मानांकित आरएमव्ही गुरुसाईदत्त पराभूत झाला आहे.
जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत दोनदा कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूकडून इंडोनेशियामधील स्पध्रेत मोठय़ा अपेक्षा केल्या जात होत्या. मात्र चीनच्या ही बिंगजियाओने २३-२१, २१-१३ असा तिचा पराभव केला. पुरुषांमध्ये भारताच्या अग्रमानांकित श्रीकांतने मलेशियाच्या १५व्या मानांकित टेक झि सो याचा २१-१०, २१-५ असा पराभव केला. तर मलेशियाच्या इस्कंदर झुल्करनैन झैनुद्दीनने गुरुसाइदत्तवर २१-१४, १७-२१, २१-१५ असा विजय मिळवला.

Story img Loader