सिझियान वांगसारख्या अव्वल खेळाडूला नमवत पी.व्ही. सिंधूने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना कांस्यपदक पक्के केले. मात्र पदके पक्के झाल्याने खेळात आलेल्या शैथिल्याचा फटका सिंधूला बसला आणि तिला पराभवाला सामोरे जावे लागले. अफलातून पदलालित्य व फटक्यांवरील प्रभुत्व जपणाऱ्या स्पेनच्या कॅरोलिन मारिनने सिंधूवर २१-१७, २१-१५ अशी मात करून अंतिम फेरी गाठली. सिंधूच्या पराभवासह भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सिंधूने सलग दुसऱ्या वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावण्याचा विक्रम नावावर केला.
पहिल्या गेममध्ये मारिनने ६-२ अशी आघाडी घेतली. सिंधूने पिछाडी भरून काढत ८-७ अशी आघाडी घेतली. ९-९ अशा बरोबरीनंतर मारिनने १५-१० अशी आगेकूच केली. सिंधूने एक गुण मिळवला, पण पुन्हा मारिनने सलग चार गुण पटकावत १८-११ अशी भक्कम आघाडी घेतली. सिंधूने चार गुण मिळवत संघर्ष केला, मात्र नेटवर आदळणाऱ्या फटक्यांचा तिला फटका बसला, परंतु मारिनने आपला खेळ उंचावत पहिला गेम नावावर केला.
चुरशीच्या दुसऱ्या गेममध्ये प्रत्येक गुणासाठी मुकाबला रंगला. ६-६ अशा बरोबरीतून सिंधूने ११-९ अशी बढत मिळवली. १३-१२ बरोबरीनंतर मारिनने सलग तीन गुणांची कमाई केली. सिंधूने एक गुण मिळवत परतण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर मारिनने पुन्हा तीन गुण पटकावत आगेकूच केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा