ट्रम्प लढतीत चेयुंग गान यी हिच्यावर मात; चेन्नईची बंगळुरूवर ५-० मात
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकासह देशवासीयांची लाडकी लेक झालेल्या बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने मंगळवारी मुंबईकरांची मने आणि सामना जिंकत दुहेरी योग साधला. या सामन्यासाठी सिंधूचे संघासह कोर्टवर आगमन होताच चाहत्यांनी ‘सिंधू-सिंधू’ असा जल्लोष केला. मंगळवारी चेन्नई स्मॅशर्सने बंगळुरू ब्लास्टर्सवर ५-० असा विजय मिळवला, तर सिंधूने बंगळुरूच्या चेयुंग गान यीवर दिमाखदार विजय मिळवला.
सलामीच्या लढतीनंतर सिंधू कोर्टवर अवतरली आणि स्टेडियम ‘सिंधू-सिंधू’ जयघोषाने निनादून गेले. त्याच वेळी क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट आणि बंगळुरू ब्लास्टर्स संघाचा सहमालक सचिन तेंडुलकरचे स्टेडियममध्ये आगमन झाले. ‘सचिन सचिन’ जयघोषाला सुरुवात झाली. मात्र सिंधू सचिनच्या संघाविरुद्ध खेळणार असल्याने पुन्हा ‘सिंधू सिंधू’चा गजर सुरू झाला. चाहत्यांना अभिवादन केल्यानंतर सिंधूने खेळायला सुरुवात केली. ऑलिम्पिक पदकासह आत्मविश्वास कमालीचा उंचावलेल्या सिंधूने बंगळुरूच्या चेयुंग गान यीवर दिमाखदार विजय मिळवला. स्मॅशच्या अस्त्राचा प्रभावीपणे उपयोग करत सिंधूने दोन गेम्समध्येच चेयुंगला निष्प्रभ केले.
पहिल्या गेममध्ये चेयुंगने शरीरवेधी स्मॅशद्वारे आक्रमण करत सिंधूला नामोहरम केले. शैलीदार फटक्यांच्या साह्य़ाने चेयुंगने ५-० अशी भक्कम आघाडी घेतली. चेयुंगच्या आक्रमणाला सिंधूने स्मॅशच्याच आधारे प्रत्युत्तर देण्याचे ठरवले. तडाखेबंद स्मॅशेस आणि चेयुंगच्या स्वैर खेळाचा फायदा उठवत सिंधूने पिछाडी ३-५, ५-७ अशी भरून काढली. शरीरवेधी स्मॅशच्या बळावर सिंधूने चेयुंगला निरुत्तर करत ९-९ अशी बरोबरी केली. सिंधूचा फटका नेटवर आदळला आणि चेयुंगने १०-९ निसटती आघाडी घेतली. सिंधूने अचूक कोन साधत चेयुंगला शटलपर्यंत पोहोचू दिले नाही आणि गेम पॉइंट वाचवला. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत तीन गुणांसह सिंधूने पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये चेयुंगने ३-० आघाडी घेतली. सिंधूने स्मॅशच्या जोडीला ड्रॉप आणि क्रॉसकोर्ट फटक्यांच्या आधारे ३-३ अशी बरोबरी केली. शैलीदार फटक्यांसह सिंधूने ६-४ अशी आघाडी घेतली. यानंतर प्रदीर्घ रॅलीवर भर देत सिंधूने चेयुंगला तंगवले. या वेळी चेयुंगच्या हातून झालेल्या चुकांचा पुरेपूर फायदा उठवत सिंधूने ११-६ फरकासह दुसरा गेमही जिंकला आणि दणदणीत विजय साकारला.
‘‘मी पिछाडीवर होते. मात्र पुनरागमन करू शकेन असा विश्वास होता. अकरा गुणांचा डाव फसवा आहे. पहिल्या गुणापासून तयार राहावे लागते. चाहत्यांचा प्रतिसाद भन्नाट होता. संपूर्ण स्पर्धेत असेच प्रेम मिळत रहावे,’’ असे पी.व्ही. सिंधूने सांगितले.
दरम्यान सलामीच्या लढतीत चेन्नई स्मॅशर्सच्या पारुपल्ली कश्यपने बंगळुरू ब्लास्टर्सच्या सौरभ वर्मावर ११-८, ११-५ असा विजय मिळवला. मिश्र दुहेरीच्या लढतीत चेन्नईच्या ख्रिस आणि गॅब्रिएल अॅडकॉक जोडीने बंगळुरूच्या अश्विनी पोनप्पा आणि येऑन सेआंग यो जोडीवर ११-६, ८-११, १५-१४ अशी मात केली. पुरुष एकेरीच्या लढतीत बंगळुरूच्या व्हिक्टर अॅक्सलेनने चेन्नईच्या टॉमी सुगिआर्तोचा ११-७, १३-११ असा पराभव केला. शेवटच्या लढतीत चेन्नईच्या ख्रिस आणि मॅड्स पिइलर कोल्डिंग जोडीने बंगळुरूच्या स्युंग ह्य़ुन को आणि येऑन सेआँग योचा ११-७, ७-११, १३-११ असा पराभव केला.