Padma Awards 2025 Indian Players List in Marathi: २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला आज (२५ जानेवारी) रोजी पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये विविध क्रीडाक्षेत्रातील क्रीडापटूंना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. भारताचा माजी हॉकी गोलरक्षक पीआर श्रीजेश याला पद्मभूषण तर आर अश्विन आणि फुटबॉल दिग्गज आयएम विजयन यांना शनिवारी २५ जानेवारीला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पॅरा खेळाडू हरविंदर सिंग आणि सत्यपाल सिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित नागरी सन्मानांपैकी एक आहेत, जे पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. कला, समाजसेवा, सार्वजनिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य, वैद्यक आणि साहित्य यासारख्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी या पुरस्कारांचा गौरव केला जातो. भारतातील चौथ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार म्हणून पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण या पदानुक्रमानुसार प्रदान केले जातात.

आर अश्विन

क्रिकेटमधील योगदानाबद्दल अश्विनला पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारताच्या या फिरकीपटून २०२४ मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या मध्यावर खेळातून निवृत्ती घेतली आणि चमकदार कारकिर्दीला अलविदा केलं. अश्विनने १०६ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्याच्या नावावर ५३७ विकेट आहेत. यासह कसोटीमध्ये तो भारतासाठी आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. फक्त गोलंदाजी नव्हे तर फलंदाजीतही अश्विनने चमकदार कामगिरी करत शतक झळकावले आहे.

पीआर श्रीजेश

गेल्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये भारताने जिंकलेल्या सलग दुसऱ्या कांस्यपदकात श्रीजेशने अविभाज्य भूमिका बजावली होती. पॅरिसमधील ऑलिम्पिकपूर्वी गोलकीपर श्रीजेशने खेळातून निवृत्तीची घोषणा केली आणि ग्रेट ब्रिटनविरुद्ध शूटआऊट विजयासह स्पर्धेदरम्यान महत्त्वपू्र्ण भूमिका बजावली. निवृत्तीनंतर, श्रीजेशची भारताच्या कनिष्ठ पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. श्रीजेश स्वबळावर भारताला हॉकीमध्ये अनेक सामने जिंकून दिले आहेत.

आयएम विजयन

पद्मश्री पुरस्काराचे आणखी एक विजेते आयएम विजयन आहेत, जे भारतातील महान फुटबॉलपटूंपैकी एक होते. केरळच्या माजी फुटबॉलपटूने २००० ते २००४ दरम्यान भारताचा कर्णधार म्हणूनही जबाबदारी सांभाळली. विजयन यांनी ७२ सामन्यांमध्ये भारतासाठी २९ आंतरराष्ट्रीय गोल केले.

हरविंदर सिंग

पॅरालिम्पियन आणि २०२४ पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता हरविंदर सिंग यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. हरविंदरने पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह ओपनच्या अंतिम फेरीत पोलंडच्या लुकाझ सिझेकचा पराभव करून पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताचे चौथे सुवर्णपदक निश्चित केले.

पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले भारतीय क्रीडापटू

पीआर श्रीजेश (माजी हॉकी खेळाडू) – पद्मभूषण
आर अश्विन (माजी भारतीय क्रिकेटपटू) – पद्मश्री
आयएम विजयन ( माजी फुटबॉलपटू) – पद्मश्री
सत्यपाल सिंग – पद्मश्री
हरविंदर सिंग (पॅरा नेमबाज) – पद्मश्री

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padma awards 2025 r ashwin honoured with padma shri padma bhushan for pr sreejesh read full list of indian players bdg