दक्षिण कोरियातील इन्चॉन येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या टेनिस संघात लिएण्डर पेस आणि सानिया मिर्झा या दिग्गजांचे पुनरागमन झाले असून त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. निवड समितीने १२ सदस्यीय संघाची घोषणा केली, ज्यामध्ये रोहन बोपण्णा, सोमदेव देववर्मन, सनम सिंग या युवा खेळाडूंचा समावेश आहे.
दरम्यान, राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख अनिल धुपर यांनी पेसच्या निवडीचे समर्थन केले. पेस कोणाच्या साथीने खेळणार असे विचारले असता, कर्णधार आनंद अमृतराज यासंदर्भात निर्णय घेतील असे धुपर म्हणाले. महिला संघात सानियासह प्रार्थना ठोंबरे, स्नेहादेवी रेड्डी, नताशा पाल्हा, रिशिका सुनहारा यांचा समावेश आहे. सानियाची आई नसिमा मिर्झा महिला संघाची कर्णधार असेल.

Story img Loader