जागतिक दुहेरी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेला लिएण्डर पेस चेन्नई खुल्या टेनिस स्पध्रेत सलग तिसरे विजेतेपद गाठण्याच्या इष्रेने नव्या साथीदारासह उतरणार आहे. फ्रान्सचा ईडॉर्ड रॉजर-व्हॅसलिन याच्या साथीने पेस खेळणार आहे.
३९ वर्षीय पेससाठी २०१२ हे वर्ष यशदायी ठरले. त्याने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमसहित दुहेरीमधील चार विजेतेपदांची कमाई केली. याचप्रमाणे टोकियो आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेत पेसने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली.
२९ वर्षांच्या व्हॅसलिनसाठीसुद्धा चालू वर्ष फलदायी ठरले. त्याने दुहेरीमधील तीन स्पर्धामध्ये जेतेपद मिळविले. याचप्रमाणे दुहेरीच्या क्रमवारीत ३८व्या स्थानापर्यंत मजल मारली होती. सध्या तो ४३व्या स्थानावर आहे.
पेसने चेन्नई खुल्या टेनिस स्पध्रेत १७वेळा सहभाग घेत सहा जेतेपद जिंकली आहेत. यावेळी पेस प्रथमच व्हॅसलिनसोबत उतरत आहे.

Story img Loader