Wasim Akram on Pakistan Coaches’ Problems: पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम म्हणाला की, “प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यावर होणारी टीका, वाईट वागणूक आणि द्वेषामुळे राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद घेण्याचा विचार कधीच केला नव्हता.” अक्रम पुढे म्हणाला की, “जर संघ चांगली कामगिरी करत नसेल तर तो टीका स्वीकारू शकतो. मात्र, पाकिस्तान क्रिकेटमध्ये ज्याप्रकारे कर्णधार आणि प्रशिक्षकावर केवळ टीकाच होत नाही, तर शिवीगाळही केली जाते ते असह्य आहे.”
स्विंगचा सुलतान म्हटल्या जाणार्या अक्रमने पाकिस्तानी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आपल्या देशात कर्णधार आणि प्रशिक्षकांना ज्या शिवीगाळ आणि कधीकधी द्वेषाचा सामना करावा लागतो, मला वाटत नाही की मी त्यासाठी तयार आहे. माझ्याकडे सहनशीलतेची ती पातळी नाही, विशेषत: जेव्हा सोशल मीडिया वापरण्याची वेळ येते. असे बरेच लोक आहेत ज्यांचे काम फक्त नकारात्मक बोलणे आहे. लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यापेक्षा त्यापासून अलिप्त राहिलेले केव्हाही चांगलेच कारण फुकटच्या शिव्या कोण खाणार रोज? त्यापेक्षा आहे ते बरं चाललं आहे.”
बाबर आझमच्या समर्थनार्थ वसीम अक्रम
दरम्यान, बाबर आझमच्या कर्णधारपदावर निर्माण झालेल्या प्रश्नावर वसीम अक्रमनेही आपले मत मांडले. तो म्हणाला, “मला वाटतं ही चूक असेल. कारण तुम्ही त्याची जागा कोणत्याही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून घेतली तरी काही फरक पडणार नाही.” तो पुढे म्हणाला, “या प्रकरणी आमच्याकडे कोणते पर्याय आहेत? आपण सर्वांनी साथ दिली तर उत्तम पर्याय ठरेल. तो तरुण आहे आणि कर्णधार म्हणून चांगला असेल. मला वाटतं कोणीही जन्मजात कर्णधार आणि नेता नसतो, या गोष्टी वेळ आणि अनुभवासोबत येतात.”
पीएसएलमधील प्रशिक्षकाच्या भूमिकेवर अक्रम काय म्हणाला?
वसीम अक्रम हा पाकिस्तान सुपर लीगमधील कराची किंग्जचा प्रशिक्षक आहे. यावर तो म्हणतो की “लीग क्रिकेट वेगळं आहे. दबाव आणि अपेक्षांची पातळी इथे वेगळी आहे. त्यामुळेच मी कराची किंग्जमध्ये सामील झालो, असेही अक्रम सांगतो की काही खेळाडू कराचीचा प्रशिक्षक म्हणून त्याला नियमित भेटतात आणि तो त्यांना नेहमीच मदत करतो.”