पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज भारतीय फलंदाजांची चांगलीच परीक्षा घेऊन धूळ चारतील, असे मत पाकिस्तानचा एकदिवसीय संघाचा कर्णधार मिसबाह-उल-हक आणि ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार हाफिझ मोहम्मद यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय फलंदाजांना त्यांच्याच मातीत धूळ चारण्याची कुवत पाकिस्तान संघातील वेगवान गोलंदाजांमध्ये आहे, असे मत हाफिझने व्यक्त केले आहे. भारतीय दौरा हा युवा वेगवान गोलंदाजांना संघातील स्थान पक्के करण्याची संधी असेल, असे मिसबाहने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघात अनुभवी उमर गुलसह जुनैद खान, वहाब रियाझ, मोहम्मह इरफान, अन्वर अली, असद खान आणि सोहेल तन्वीर या गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.

Story img Loader