Pakistan vs Afghanistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: अफगाणिस्तानने विश्वचषकाच्या २२व्या सामन्यात पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला आहे. या विश्वचषकातील पाकिस्तानला हा मोठा धक्का आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना पाकिस्तानने २८२ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानने दोन गडी गमावून २८६ धावा केल्या आणि सामना जिंकला. त्यामुळे आता पाकिस्तान संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचबरोबर या विजयानंतर अफगाणिस्तान संघाने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर होता, मात्र आता तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

अफगाणिस्तानने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला आहे. या विश्वचषकातील हा तिसरा मोठा धमाका आहे. याआधी अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला होता, तर दक्षिण आफ्रिकेला नेदरलँडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी गमावून २८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने ४९ षटकांत दोन गडी गमावून २८६ धावा केल्या आणि सामना आठ विकेट्स राखून जिंकला. पाकिस्तानकडून बाबरने ७४ धावा आणि अब्दुल्ला शफीकने ५८ धावांची खेळी केली. त्याचवेळी अफगाणिस्तानसाठी इब्राहिम झद्रानने ८७ धावा, रहमत शाहने नाबाद ७७ आणि रहमानउल्ला गुरबाजने ६५ धावा केल्या. कर्णधार शाहिदीने नाबाद ४८ धावा केल्या.

India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
Mohammad Rizwan Says I am only a captain for toss and presentation
Mohammad Rizwan : ‘मी फक्त टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी कर्णधार…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
Champions Trophy Mohammed Hafeez Big Statement About India wont travel to Pakistan Said Somehow Not Secure for India
Champions Trophy: “भारतीय संघासाठी पाकिस्तान सुरक्षित नाही…”, पाकिस्तानच्या माजी खेळाडूच्या पोस्टने उडाली खळबळ, PCBला दाखवला आरसा
Champions Trophy Javed Miandad Angry on India for Not Travelling Pakistan Said If We Dont Play India at all Pakistan cricket will Prosper
Champions Trophy: “भारत-पाकिस्तान सामनाच नाही झाला तर…”, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येणार नसल्याने BCCI, ICCवर संतापले जावेद मियांदाद

पाकिस्तानकडून बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीक यांनी अर्धशतके झळकावली. बाबरने सर्वाधिक ७४ धावा केल्या. अब्दुल्ला शफीकने ५८ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांमध्ये शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यांनी शानदार फलंदाजी करत संघाला २८२ धावांपर्यंत नेले. दोघांनी ४०-४० धावांचे योगदान दिले. सौद शकीलने २५ आणि इमाम उल हकने १७ धावा केल्या. मोहम्मद रिझवानला केवळ आठ धावा करता आल्या. शाहीन आफ्रिदी तीन धावा करून नाबाद राहिला. अफगाणिस्तानकडून नूर अहमदने तीन आणि नवीन उल हकने दोन गडी बाद केले. मोहम्मद नबी आणि अजमतुल्ला उमरझाई यांना प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – PAK vs AFG: रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रानने पाकिस्तानच्या गोलंदाजांना फोडला घाम, विश्वचषकात केले तीन विक्रम

२८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली. गुरबाज आणि इब्राहिम यांनी पॉवरप्लेमध्येच ६० धावा जोडल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. गुरबाज ६५ धावा करून बाद झाला. यानंतर इब्राहिमने रहमत शाहच्या साथीने ६० धावांची भर घातली. इब्राहिम ८७ धावांवर बाद झाला, पण यानंतर अफगाणिस्तानने एकही विकेट गमावली नाही. शाहिदी आणि रहमत शाह यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ९६ धावांची भागीदारी करत अफगाणिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. विश्वचषकात पहिल्यांदाच अफगाणिस्तान संघाने दोन सामने जिंकले आहेत. त्याचवेळी, एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला पहिल्यांदाच अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता पाकिस्तानचा संघ सलग तीन सामने हरला आहे.