PAK vs AFG, World Cup: अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने सामन्यानंतर आगामी विश्वचषक सामन्यांबाबत सूचक विधान केले आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्यात आठ गडी राखून दणदणीत विजय मिळविल्यानंतर चालू असलेल्या आयसीसी पुरुष विश्वचषक २०२३मध्ये आमचा संघ अधिक सामने जिंकू शकतो, असा आम्हाला आत्मविश्वास वाटत आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी करत या विश्वचषकातील आपला दुसरा विजय संपादन केला.

सामन्यानंतर बोलताना शाहिदीने सांगितले की, “२८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ते खूप शानदार फलंदाजी करत होता. चेन्नईमध्ये अफगाणिस्तानने २८३ धावांचे लक्ष्य आठ गडी आणि एक षटक शिल्लक असताना पूर्ण केले.” हशमतुल्ला शाहिदी पुढे म्हणाला, “या विजयाची चटक चांगली आहे. आम्ही ज्या पद्धतीने धावांचा पाठलाग केला तो खूप काही शिकवून जाणारा होता. आता आम्ही इतर संघांबरोबर खेळण्याची वाट पाहत आहोत. बघा, आम्ही गेल्या दोन वर्षांत दर्जेदार क्रिकेट खेळलो आणि त्यानंतर आशिया कप खेळलो. त्यामुळे या मोठ्या स्पर्धांमध्ये कसे खेळायचे याचा अनुभव आला आहे.”

India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”
Mohammad Rizwan Says I am only a captain for toss and presentation
Mohammad Rizwan : ‘मी फक्त टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी कर्णधार…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
ajay devgan and aamir khan
‘इश्क’च्या शूटिंगवेळी चिपांझीने केलेला हल्ला; ‘वाचवा, वाचवा’ म्हणत आमिर खान ओरडला अन् अजय देवगणने धावत्या कारमधून…
Mohammed Rizwan Takes DRS After Consulting With Adam Zampa and Loses Review Watch Video AUS vs PAK 2nd ODI
PAK vs AUS: हा काय प्रकार? मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या सांगण्यावरून घेतला रिव्ह्यू अन् सापडला अडचणीत; पाहा VIDEO

हेही वाचा: PAK vs AFG: अफगाणिस्तानच्या विजयानंतर प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट भावूक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हशमतुल्ला रमीझ राजा यांच्याशी बोलताना म्हणाला, “आम्हाला आमच्या संघातील खेळाडूंची गुणवत्ता दाखवायची होती आणि सकारात्मक क्रिकेट खेळायचे होते. आम्ही इंग्लंड आणि पाकिस्तानला पराभूत केले आहे आणि आशा आहे की आणखी चांगले घडेल. मी आधीच सांगितलं होतं, आम्ही या स्पर्धेत जिंकण्यासाठी आलो आहोत. मोठ्या संघांना पराभूत करून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. आगामी सामन्यांसाठी सर्व खेळाडू उत्सुक आहेत. संघातील सर्वांना खात्री आहे की आम्ही येथून पुढे असेच उत्तम खेळत राहू.”

शाहिदीने १८ वर्षीय फिरकीपटू नूर अहमदचे कौतुक केले आणि त्याच्या कामगिरीचे ‘अप्रतिम’, असे वर्णन केले. चेन्नई येथे वन डे विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या अहमदने पाकिस्तानविरुद्ध तीन विकेट्स घेतल्या होत्या. तो म्हणाला, “फिरकीपटू शानदार गोलंदाजी करत आहेत. नूरने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती कमाल होती. गुरबाज आणि इब्राहिम यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली ती आमच्यासाठी खूप आश्वासक होती. त्यानंतर मग रेहमत आणि मी ज्या पद्धतीने खेळपट्टीवर टिकून फटकेबाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.”

हेही वाचा: SA vs BAN, World Cup: बांगलादेश दक्षिण आफ्रिकेवर पडणार का भारी? जाणून घ्या दोन्ही संघांचे बलाबल

पाकिस्तानकडून बाबरने ७४ धावा आणि अब्दुल्ला शफीकने ५८ धावांची खेळी केली. त्याचवेळी अफगाणिस्तानसाठी इब्राहिम झद्रानने ८७ धावा, रहमत शाहने नाबाद ७७ आणि रहमानउल्ला गुरबाजने ६५ धावा केल्या. कर्णधार शाहिदीने नाबाद ४८ धावा केल्या.

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील पाकिस्तानचा हा सलग तिसरा पराभव आहे. यासोबतच अफगाणिस्तानने दुसऱ्या अपसेटसह पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. आता हा संघ सहाव्या स्थानावर आला आहे, तर गतविजेता इंग्लंड संघ शेवटच्या स्थानावर आहे. या तिन्ही अपसेटमुळे पॉइंट टेबल आणि सेमीफायनलची समीकरणे खूपच रंजक झाली आहेत.