Bangladesh Beat Pakistan For The First Time in History of Test: बांगलादेशच्या क्रिकेट संघाने कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्य रावळपिंडी कसोटी सामन्यात बांगलादेशने पाकिस्तान संघाचा १० विकेट्सने पराभव केला आहे. बांगलादेशने पाकिस्तानविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात आपली पकड घट्ट केली. रावळपिंडीत पहिल्या डावात ६ बाद ४४८ धावा केल्यानंतर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात १४६ धावांवर बाद झाला. मोहम्मद रिझवान वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – WTC Points Table: श्रीलंकेचा पराभव करत इंग्लंडची WTC गुणतालिकेत मोठी झेप, पाकिस्तानसह ‘या’ देशांना टाकलं मागे, भारत कितव्या स्थानी?

बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला तो मुशफिकर रहीम, ज्याने पहिल्या डावात १९१ धावांची खेळी केली, तर दुसऱ्या डावात मेहंदी हसन मिराज (४ विकेट) आणि शकीब अल हसन (३ विकेट) यांनी दमदार गोलंदाजी करत पाकिस्तानच्या फलंदाजांना फार काळ मैदानात टिकू दिले नाही.

रावळपिंडी कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये १४ सामने झाले आहेत. यादरम्यान पाकिस्तानने १२ कसोटी जिंकल्या आहेत. वादग्रस्त शाकिब अल हसनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने इतिहास रचला आहे. शकिबवर गिरणी कामगाराच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याच्या खेळण्यावर अनिश्चितता आहे. दरम्यान, त्याने ३ मोठ्या विकेट घेतल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराझने सर्वाधिक ४ विकेट घेतले. दुसऱ्या डावात बांगलादेशला विजयासाठी ३० धावांचे लक्ष्य होते, बांगलादेशने ते सहज गाठले आणि सामना १० गडी राखून जिंकला.

हेही वाचा – Virat Kohli Shikhar Dhawan: “तुझी ट्रेडमार्क स्माईल अन् असंख्य आठवणी…” शिखर धवनच्या निवृत्तीवर विराट कोहलीची भावुक पोस्ट, पाहा काय म्हणाला?

PAK vs BAN 1st Test: मोहम्मद रिझवानची शतकी-अर्धशतकी खेळी व्यर्थ

पाकिस्तानकडून पहिल्या डावात मोहम्मद रिझवानने १७१ धावांची नाबाद खेळी तर सौद शकीलने १४१ धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ४४८ धावा केल्या, मात्र दुसऱ्या डावात बांगलादेशच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे गारद झाली. फक्त रिझवानने ५१ धावांची खेळी खेळली तर इतर फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. बाबर आझमला पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही तर दुसऱ्या डावातही तो २२ धावा करून बाद झाला. रिझवानने दोन्ही डावात शानदार फलंदाजी केली, पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळू शकली नाही आणि पाकिस्तानचा पराभव झाला.

हेही वाचा – VIDEO: “कबुतरासारखा उड्या मारत असतो…” पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानवर भारतीय अंपायरचं मोठं विधान, सर्व विकेटकिपर्सनाही दिली सक्त ताकीद

PAK vs BAN 1st Test: बांगलादेशच्या विजयाचा हिरो

पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवण्यात बांगलादेशच्या संपूर्ण संघाचे मोठे योगदान होते, परंतु या संघाच्या विजयाचा खरा हिरो मुशफिकुर रहीम होता, ज्याने पहिल्या डावात १९१ धावा करून पाकिस्तानच्या विजयाचे मनसुबे उधळले. रहीम व्यतिरिक्त पहिल्या डावात सादमान इस्लामने ९३ धावा, मोमिनुल हकने ५० धावा, लिटन दास ५६ धावा आणि मेहंदी हसन मिराजने ७७ धावांचे योगदान दिले. याशिवाय या संघासाठी दुसऱ्या डावात शाकिबने ३ तर मिराजने ४ विकेट घेत पाकिस्तानच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs ban 1st test bangladesh beat pakistan by 10 wickets 1st time history of test cricket shakib al hasan bdg