Pakistan vs Bangladesh, Super 4 Match Update: आज आशिया कप २०२३च्या सुपर-४ फेरीचा पहिला सामना खेळला जात आहे. पाकिस्तानसमोर बांगलादेशचे आव्हान आहे. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. सुपर-४मध्ये पोहोचलेल्या चार संघांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश व्यतिरिक्त भारत आणि श्रीलंकेचे संघ आहेत. सुपर फोरमधील दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने १९३ धावा केल्या. कर्णधार शाकिब अल हसन आणि मुशफिकुर रहीम यांच्या व्यतिरिक्त एकही फलंदाज खेळपट्टीवर तक धरू शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशचा डाव १९३ धावांवर आटोपला आहे. बांगलादेशची अखेरची विकेट शरीफुल इस्लामच्या रूपाने पडली. नसीम शाहने त्याला क्लीन बोल्ड केले. बांगलादेशचा संघ ३८.४ षटकांत केवळ १९३ धावाच करू शकला. मुशफिकर रहीमने सर्वाधिक धावा केल्या. कर्णधार शाकिबने ५३ धावांची खेळी खेळली. मोहम्मद नईमने २० धावांचे योगदान दिले. भारताविरुद्धच्या सामन्यात सर्व १० विकेट्स घेत इतिहास रचणाऱ्या पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांनी या सामन्यातही नऊ विकेट्स घेतल्या. हारिस रौफने चार आणि नसीम शाहने तीन विकेट्स घेतल्या. शाहीन आफ्रिदी आणि फहीम अश्रफ यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. इफ्तिखार अहमदलाही एक विकेट घेण्यात यश मिळाले.

फहीम अश्रफने शाकिब अल हसनला बाद केले. त्याचा झेल फखर जमानने घेतला. शाकिबने ५७ चेंडूत ५३ धावांची खेळी खेळली. त्याने मुशफिकर रहीमसोबत पाचव्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. सध्या शमीम हुसेन रहिमला पाठिंबा देण्यासाठी आला आहे. शाकिबचे वन डे कारकिर्दीतील हे ५४वे अर्धशतक होते. त्याचवेळी रहीमने ७१ चेंडूत वन डे कारकिर्दीतील ४६वे अर्धशतकही पूर्ण केले.

लाहोरच्या मैदानावर १९४ धावांचे लक्ष्य पाकिस्तानसाठी फारसे अवघड असणार नाही. हा सामना जिंकून पाकिस्तानी संघ अंतिम फेरीतील आपला दावा मजबूत करू इच्छितो. मात्र, जर बांगलादेशच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली तर सामन्याचे चित्र पालटू शकते. गद्दाफी स्टेडियम, लाहोरयेथे झालेला मागील एकदिवसीय सामन्यातील आकडेवारी पाहिल्यास, येथील खेळपट्टी तटस्थ राहिली आहे. साधारणपणे, लाहोरची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना जास्त उसळी देत ​​नाही आणि चेंडूही स्विंग होत नाही. चांगली लाईन-लेंथ असलेली गोलंदाजी आणि त्यात जर विविधता वापरली तर येथे खूप मदत मिळू शकते. खेळपट्टीच्या संथपणामुळे मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू सामन्यात चांगली कामगिरी करू शकतात. लाहोरमधील ऑफ-स्पिनर्सपेक्षा लेग-स्पिनर अधिक प्रभावी ठरू शकतात.

हेही वाचा: Australia Team Announced: ICC वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार ऑस्ट्रेलियाने जाहीर केली तगडी टीम, कोणत्या खेळाडूला मिळाले संघात स्थान?

दोन्ही संघांची प्लेईंग ११

पाकिस्तान: फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ.

बांगलादेश: मोहम्मद नईम, लिटन दास, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद हृदोय, शमीम होसेन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, हसन महमूद.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs ban bangladesh set a target of 194 runs for pakistan pakistani fast bowlers got nine wickets avw
Show comments