PAK vs BAN Pakistan Captain Shan Masood Statement: सध्या जागतिक क्रिकेट वर्तुळात पाकिस्तान चर्चेचा विषय ठरला आहे. पाकिस्तानला बांगलादेशकडून पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रावळपिंडी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने ६ विकेट्सने पराभूत केले. यासह बांगलादेशने प्रथमच कसोटी मालिकेत पाकिस्तानचा पराभव केला. हा पाकिस्तानसाठी लाजिरवाणा दिवस होता. कॅप्टन शान मसूदसाठीही हा पराभव मोठा धक्का होता. जेव्हापासून शान मसूदने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हापासून संघ सातत्याने कसोटीत पराभूत होत आहे. आधी ऑस्ट्रेलियाने लाजिरवाणे पराभव केला आणि आता बांगलादेशसमोर त्यांनी गुडघे टेकले. मालिका गमावल्यानंतर आता शान मसूद पाहा नेमकं काय म्हणाला.
बांगलादेशने पहिली कसोटी मालिका १० विकेट्सने जिंकली तर दुसऱ्या कसोटी सामन्यात चार दिवसांत बांगलादेशने विजय मिळवला. दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. दोन्ही कसोटी या रावळपिंडी येथे झाल्या. पाकिस्तान संघाची तिन्ही युनिट मधील खराब कामगिरी यामुळे संघाला हा पराभव पत्करावा लागला.
हेही वाचा – Bangladesh beat Pakistan by 6 Wickets: पाकिस्तान चारीमुंड्या चीतपट; बांगलादेशचा ऐतिहासिक मालिका विजय
बांगलादेशविरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद भडकला
पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद पराभवानंतर म्हणाला, हा निकाल अत्यंत निराशाजनक आहे. आम्ही मायदेशात होणाऱ्या सामन्यांसाठी उत्सुक होतो. हा निकालही ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेसारखाच आहे. आम्ही पराभवातूनही शिकलो नाही. आम्ही ऑस्ट्रेलियात चांगले क्रिकेट खेळत होतो पण कामगिरी चांगली केली नाही, या गोष्टीवर आम्हाला काम करण्याची गरज आहे. माझ्या कार्यकाळात असे ४ वेळा घडले आहे जेव्हा आम्ही सामन्यात वर्चस्व गाजवत होतो, पण नंतर सामना हातातून निसटला.
हेही वाचा – WTC 2025 अंतिम फेरीची तारीख जाहीर, ICC ने केली घोषणा; पहिल्यांदाच ‘या’ मैदानावर होणार फायनल
शान मसूद पुढे म्हणाला, मला वाटते की कसोटी क्रिकेटमध्ये फिटनेसच्या दृष्टीने अजूनही काही आवश्यक आहे. पहिल्या कसोटीत आम्ही चार वेगवान गोलंदाज खेळवले आणि त्याचे कारण म्हणजे तीन खेळाडूंवर ताण जास्त येईल असे आम्हाला वाटले. मला वाटतं या कसोटी सामन्यातही फक्त ३ गोलंदाज आणि २ फिरकीपटू पुरेसे नव्हते, आम्ही आणखी एका वेगवान गोलंदाजासह खेळू शकलो असतो.
लिटन दासचे उदाहरण देताना पाकिस्तानचा कर्णधार म्हणाला – पहिल्या डावात २७४ धावा ही चांगली धावसंख्या होती, पण मी आणि सॅम लिटनप्रमाणे आणखी धावा करू शकलो असतो. बांगलादेशच्या ६ विकेट २६ धावांवर पडल्या होत्या तेव्हा आम्ही त्यांना लवकर बाद करायला हवे होते. यावर (गोलंदाजी) काम करणे आणि शक्य तितक्या लवकर मार्ग काढणे आवश्यक आहे. हे सर्व हताश करणार आहे, पण नेहमी काहीतरी शिकण्यासारखं असतं.
हेही वाचा – PAK vs BAN: पाकिस्तानच्या पराभवानंतर बाबर आझमने कसोटीमधून घेतली निवृत्ती? व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांच्याबद्दल कर्णधार म्हणाला- आम्ही शाहीन आणि नसीमचा संघात समावेश केला आहे. शाहीनने गेल्या एक वर्षापासून सर्व फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण खेळला आहे. परंतु आम्हाला अधिक तंदुरुस्त, चपळ आणि चांगल्या तयारीनिशी उतरणं आवश्यक आहे. अनेक कसोटी सामने आणि देशांतर्गत क्रिकेट सामन्यांसह मोठा सीझन असणार आहे आणि यातूनच इंग्लंडविरूद्धच्या सामन्यांसाठी चांगली तयारी करावी लागणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd