Pakistan vs Bangladesh, ICC Cricket World Cup 2023: अखेर पाकिस्तान संघाला विजय मिळाला असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. सलग चार पराभवानंतर पाकिस्तानने बांगलादेशवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. सलामीवीर फखर जमान आणि अब्दुला शफीक यांनी तुफानी अर्धशतके झळकावत संघाला विजय मिळवून दिला. या विजयाने विश्वचषक २०२३च्या गुणतालिकेत आणखी बदल झाला आहे. बांगलादेश या विश्वचषकातून जवळपास बाहेर पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वचषकाच्या ३१व्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर बांगलादेशचा कर्णधार शकिबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा संघ ४५.१ षटकात २०४ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानने ३२.३ षटकात तीन विकेट्स गमावत २०५ धावा करत सामना जिंकला.

पाकिस्तानचा मोठा विजय

बांगलादेशविरुद्ध सात गडी राखून विजय मिळवून पाकिस्तानने स्पर्धेत स्वतःला जिवंत ठेवले आहे. त्यांनी कोलकात्यात बांगलादेशी संघाचा वाईट पद्धतीने पराभव केला. या पराभवानंतर बांगलादेशी संघ विश्वचषकातून बाहेर पडला. स्पर्धेतून बाहेर पडणारा तो पहिला संघ ठरला. त्याचे सात सामन्यांत केवळ दोन गुण आहेत. उर्वरित दोन सामने जिंकूनही त्याचे केवळ सहा गुण होतील. दुसरीकडे, पाकिस्तानचे आता सात सामन्यांत सहा गुण झाले आहेत. त्याचे उर्वरित दोन्ही सामने जिंकल्यास तो उपांत्य फेरी गाठू शकतो.

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर बांगलादेशचा कर्णधार शकिबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा संघ २०४ धावांत आटोपला. पाकिस्तानने तीन गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले आणि सामना जिंकला. पाकिस्तानकडून फखर जमानने सर्वाधिक ८१ धावा केल्या. त्याचे शतक हुकले मात्र, त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. अब्दुल्ला शफीकने ६८ धावा केल्या. मोहम्मद रिझवान २६ आणि इफ्तिखार अहमद १७ धावांवर नाबाद राहिला. कर्णधार बाबर आझम आजच्या सामन्यातही अपयशी ठरला, केवळ ९ धावा करून बाद झाला. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

हेही वाचा: World Cup 2023: “पीसीबीला आम्ही विश्वचषक जिंकावा असे…”,पाकिस्तानच्या वरिष्ठ खेळाडूने केला मोठा खुलासा

पाकिस्तानच्या वसीम आणि शाहीनने प्रत्येकी तीन विकेट्स घेतले

तत्पूर्वी, बांगलादेशकडून महमुदुल्लाहने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५६ धावांची झुंजार अर्धशतकी खेळी खेळली. लिटन दास ४५ आणि कर्णधार शाकिब-अल-हसन ४३ धावा करून बाद झाले. शेवटी मेहदी हसन मिराजने २५ धावा करत बांगलादेशला दोनशेचा टप्पा पार करण्यात मदत केली. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियर आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. हारिस रौफला दोन गडी बाद करण्यात यश मिळाले. इफ्तिखार अहमद आणि उसामा मीर यांनी प्रत्येकी एक विकेट घेत त्यांना मदत केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs ban fakhar zaman shafiqs brilliant fifties pakistans resounding victory over bangladesh by seven wickets avw
Show comments