PAK vs BAN Test Series Yasir Arafat says Pakistan team of jokers : पाकिस्तान संघाची अवघ्या क्रिकेट विश्वात बदनामी होत आहे कारण अलीकडेच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांना त्यांच्याच घरच्या मैदानावर २-० असा पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की मागील ७ कसोटी मालिकांमध्ये पाकिस्तान संघाला केवळ एक मालिका जिंकता आली आहे. त्यामुळे पाकिस्तान संघातील खेळाडू आणि पीसीबीला चाहत्यासंह माजी क्रिकेटपटूंच्या टीकेला पण सामोरे जावे लागत नाही. आता माजी क्रिकेटर यासिर अराफतने पाकिस्तान संघाची खिल्ली उडवताना सर्व खेळाडूंना ‘जोकर’ म्हटले आहे.

एकीकडे यासिर अराफातने बांगलादेशविरुद्धच्या पराभवावर पाकिस्तान संघावर टीका केली. याशिवाय त्याने दुसरीरकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही (पीसीबी) सोडलेले नाही. त्याने सांगितले की १२ ते २९ सप्टेंबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी चॅम्पियन्स एकदिवसीय चषक आयोजित करणे हा अजिबात चांगला निर्णय नाही. कारण त्यानंतर एका आठवड्यानंतर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन

जेसन गिलेस्पी ऑस्ट्रेलियाला परतणार –

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघातील त्रुटींबद्दल सांगताना यासिर अराफत म्हणाला, “बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर पाकिस्तान संघातील अनेक समस्या समोर आल्या आहेत. खेळाडूंचा फिटनेस आणि तांत्रिक समस्याही आहेत. मी ऐकले आहे की, पाकिस्तान कसोटी संघाचे प्रशिक्षक जेसन गिलेस्पी ऑस्ट्रेलियाला परतणार आहेत.”

हेही वाचा – Duleep Trophy 2024: मुशीर खानचे दुलीप ट्रॉफीमध्ये शानदार शतक, भाऊ सर्फराज खानच्या प्रतिक्रियेने वेधले लक्ष, पाहा VIDEO

पीसीबी ही अनेक जोकर्सनी भरलेली सर्कस –

यासिरने आपले म्हणणे पुढे मांडताना म्हणााला, “अशा परिस्थितीत तुम्ही एकदिवसीय स्पर्धा आयोजित करत आहात. अशा निर्णयांमुळे मला पीसीबी ही जोकरनी भरलेल्या सर्कशीसारखी वाटते. कारण इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका काही आठवड्यांत सुरू होणार आहे, अशा एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. म्हणूनच असे निर्णय घेणारे अधिकारी जोकरांपेक्षा कमी नाहीत, असे मला वाटते.”

हेही वाचा – Kapil Parmar : सहा महिने कोमात राहिलेल्या कपिल परमारने ज्युडोमध्ये पटकावले ऐतिहासिक कांस्यपदक, पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

पाकिस्तान क्रिकेटचा सर्वात वाईट काळ –

क्रिकेटच्या इतिहासातील हा पाकिस्तानचा सर्वात वाईट काळ असल्याचेही म्हटले जात आहे. पाकिस्तान २०२३ विश्वचषकाच्या गट टप्प्यातून बाहेर पडला होता. त्यानंतर टी-२० विश्वचषक २०२४ च्या गट टप्प्यातील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही आणि आता बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. ही मालिका गमावल्यानंतर पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे. दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तान मजबूत स्थितीत होता, पण बांगलादेशने उत्कृष्ट कामगिरी करत दमदार पुनरागमन केले.

Story img Loader