Pakistan lose WTC Points After PAK vs BAN 1st Test: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने १० विकेट्सने विजय मिळवला. बांगलादेश संघ सध्या या मालिकेत आघाडीवर असून क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानला कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण दरम्यान, आयसीसीने पाकिस्तानच्या पराभवाची जखम अधिक खोल केली आहे, बांगलादेशच्या विजयाच्या जल्लोषातही थोडसं विरजण टाकलं आहे. आयसीसीने दोन्ही संघांचे गुण वजा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – VIDEO: सचिन तेंडुलकर आणि ‘बाकरवडी-चहा’, नवी जाहिरात का करतेय प्रेक्षकांना भावुक?

South Africa beat West Indies by 40 runs
WTC Point Table : दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने पाकिस्तानला धक्का, डब्ल्यूटीसीमध्ये झाला बदल, भारत कितव्या स्थानी?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
Sunil Gavaskar Statement on Jay Shah ICC President Post
Sunil Gavaskar on Jay Shah: ‘जय शाह ICC चे अध्यक्ष झाले तर भारतीय क्रिकेट…” सुनील गावसकरांचे शाह यांच्या अध्यक्षपदाच्या चर्चांवर मोठे वक्तव्य
Pakistan drop in the World Test Championship table after defeat against Bangladesh
PAK vs BAN : पाकिस्तानची बांगलादेशविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर क्रिकेट विश्वात फजिती! डब्ल्यूटीसी गुणतालिकेतही घसरण
Pakistan International Airlines Flight
पाकिस्तानच्या विमानाने तुम्ही कधी प्रवास केलाय का? प्रवाशाने शेअर केलेला Video पाहून तुमचीही झोप उडणार!
Pakistan Former Cricketer Javed Miandad Inzamam Ul aq Slams PCB and Cricket Team for Poor Performance PAK vs BAN
PAK vs BAN: “हा एक वाईट संकेत आहे…” फक्त खेळाडू नाही तर PCB वरही भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; जावेद मियांदाद, इंजमाम यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष
IND vs BAN Team India squad announced for 1st match against bangladesh
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! यश दयालसह ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

PAK vs BAN: पाकिस्तानला ICCने दिली ‘त्या’ चुकीची शिक्षा

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिका सामने खेळले जात आहेत. यावर आयसीसी बारीक लक्ष ठेवून आहे. थोडीशीही चूक झाली तर आयसीसी ताबडतोब कारवाई करते. रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिल्या कसोटीत स्लो ओव्हररेटमुळे पाकिस्तानचे ६ गुण आणि बांगलादेशचे ३ गुण वजा केले जातील असा निर्णय आयसीसीने दिला आहे. स्लो ओव्हर रेटशी संबंधित ICC आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, खेळाडूंना स्लो ओव्हर रेटसाठी त्यांच्या मॅच फीच्या पाच टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

पाकिस्तानला सहा संथ षटकांसाठी 6 डब्ल्यूटीसी गुण कापले गेले आणि त्यांच्या मॅच फीच्या ३० टक्के दंड ठोठावण्यात आला. ३ संथ षटकांसाठी बांगलादेशचे ३ WTC गुण कापले गेले आणि त्यांच्या मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला.

हेही वाचा – Womens T20 WC 2024: भारत पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, ICC ने जाहीर केलं T20 World Cupचे वेळापत्रक

डब्ल्यूटीसीच्या अटी आणि नियमांच्या कलम १६.११.२ नुसार संघाला प्रत्येक स्लो ओव्हरसाठी एक गुण दंड आकारला जातो. या पराभवानंतर नऊ संघांच्या डब्ल्यूटीसी गुणतालिकेत पाकिस्तान आठव्या स्थानावर घसरला तर बांगलादेश सातव्या स्थानावर आहे. याशिवाय बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनला आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे आणि त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट देखील जोडण्यात आला आहे. उभय संघांमधला दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना शुक्रवारपासून रावळपिंडीत सुरू होणार आहे.

हेही वाचा – Pakistan Cricket: मिसबाह उल हक, शोएब मलिकसहित ‘या’ ५ खेळाडूंची मेन्टॉर म्हणून नियुक्ती, PCB ची मोठी घोषणा

PAK vs BAN 1st Test: सामन्याचा लेखाजोखा

पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ४४८ धावा करत डाव घोषित केला. या धावा बांगलादेशसाठी पुरेशा असतील असे कर्णधार शान मसूदला वाटले असावे. पण बांगलादेशचे फलंदाज वेगळेच विचार करत होते. बांगलादेशने पहिल्या डावात ५६५ धावा केल्या. यासह बांगलादेशने पहिल्या डावाच्या आधारे आघाडी घेतली. पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. पण संपूर्ण संघ फलंदाजीत फेल ठरला. तेव्हा त्यांचा संपूर्ण संघ १४६ धावांवरच सर्वबाद झाला. म्हणजेच सामना पूर्णपणे बांगलादेशच्या हातात होता. बांगलादेशने सामन्याच्या दुसऱ्या डावात कोणतेही नुकसान न करता ३० धावा केल्या आणि सामना दहा विकेट्सने जिंकला.