Pakistan vs Bangladesh, ICC World Cup 2023: विश्वचषक २०२३ च्या ३१व्या सामन्यात आज पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार शाकिब-अल-हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्युनिअरच्या धारदार गोलंदाजीपुढे बांगला टायगर्सचे फलंदाज यांनी गुडघे टेकले. बांगलादेशचा संपूर्ण संघ ४५.१ षटकात २०४ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानला विजयासाठी २०५ धावांचे माफक लक्ष्य मिळाले आहे.

बांगलादेशचा डाव २०४ धावांवर आटोपला

मोहम्मद वसीम ज्युनियरने ४६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मुस्तफिजुर रहमानला त्रिफळाचीत केले. रहमानने तीन धावा केल्या. शोर्यफुल इस्लाम एक धाव घेत नाबाद राहिला. बांगलादेशचा संघ ४५.१ षटकात केवळ २०४ धावा करू शकला. बांगलादेशकडून महमुदुल्लाहने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५६ धावांची शानदार अर्धशतकी खेळी खेळली. त्याला लिटन दासने ४५ धावा करत साथ दिली. बांगलादेशचा कर्णधार शाकि-अल-हसनला सुरुवात चांगली मिळाली होती पण त्याचे तो मोठ्या खेळीत रुपांतर करू शकला नाही, त्याने अवघ्या ४३ धावा केल्या. शेवटी मेहदी हसन मिराजने २५ धावांची छोटी खेळी केली आणि तो बाद झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियर आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. हारिस रौफला दोन गडी बाद करण्यात यश मिळाले. इफ्तिखार अहमद आणि उसामा मीर यांनी प्रत्येकी एक विकेट यांना मदत केली.

India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
Mohammad Rizwan Says I am only a captain for toss and presentation
Mohammad Rizwan : ‘मी फक्त टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी कर्णधार…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा

तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार शाकिब-अल-हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाकिबने प्लेइंग-११मध्ये एक बदल केला आहे. मेहदी हसनच्या जागी तौहीद हृदयाचा प्लेइंग-११मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने तीन बदल केले आहेत. इमाम उल हक, शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांना प्लेइंग-११मधून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी फखर जमान, उसामा मीर आणि आगा सलमानला प्लेइंग-११मध्ये स्थान देण्यात आले आहे.

गुणतालिकेत दोन्ही संघांची स्थिती

बांगलादेशचा संघ आतापर्यंत सहा सामने खेळला असून एक विजय आणि पाच पराभवांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. त्याचे दोन गुण आणि निव्वळ धावगती -१.३३८ आहे. संघ विश्वचषकातून जवळपास बाहेर पडला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचे सहा सामन्यांत दोन विजयांसह चार गुण आहेत. त्याने चार सामने गमावले आहेत आणि त्याचा निव्वळ धावगती -०.३८७ आहे. पाकिस्तानला येथून सर्व सामने जिंकावे लागतील आणि इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल.

हेही वाचा: PAK vs BAN:शाहीन आफ्रिदीने रचला इतिहास! वन डे क्रिकेटमध्ये घेतल्या सर्वात जलद १०० विकेट्स, शमी-बुमराहलाही टाकले मागे

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत

पाकिस्तानः अब्दुल्ला शफीक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ.

बांगलादेश: लिटन दास, तनजीद हसन, नझमुल हुसेन शांतो, शाकिब-अल-हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्लाह, तोहिद हृदोय, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोर्यफुल इस्लाम.