Pakistan vs Bangladesh, ICC World Cup 2023: पाकिस्तानचा मुख्य वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा सर्वात जलद १०० एकदिवसीय विकेट्स पूर्ण करणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. शाहीनने विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात ही कामगिरी केली आहे. त्याने ही ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या दोन गोलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहला देखील मागे टाकले आहे.

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स येथे सुरू असलेल्या पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यात वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात १०० विकेट्स पूर्ण केल्या. शाहीनने सर्वात कमी म्हणजेच ५१ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. सर्वात जलद १०० एकदिवसीय विकेट्स पूर्ण करणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत तो आता अव्वलस्थानी आला आहे. त्याच्या आधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावावर होता. स्टार्कने ५२ डावांमध्ये १०० एकदिवसीय विकेट्स पूर्ण केल्या. भारताच्या जसप्रीत बुमराहला ५७ सामने लागले होते आणि शमीने ५६ सामन्यात १०० विकेट्स घेतल्या होत्या.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
anshul kamboj
१० पैकी १० विकेट्स! अंशुल कंबोजचा रणजी स्पर्धेत विक्रम
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
Arshdeep Singh Becomes India Most Successful T20I Fast Bowler Surpasses Jasprit Bumrah and Bhuvneshwar Kumar with 92 Wickets IND vs SA
IND vs SA: अर्शदीप सिंगने बुमराह-भुवनेश्वरला मागे टाकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल

बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या विश्वचषक सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर शाहीन आफ्रिदीने सलामीवीर तनजीद हसनला (०) पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर (LBW) पायचीत बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर आफ्रिदीनेही बांगलादेशला दुसरा धक्का दिला. डावाच्या तिसऱ्या चेंडूवर आणि पुढच्या षटकातील चौथ्या चेंडूवर शाहीन आफ्रिदीने नझमुल हुसेन शांतोला अवघ्या ४ धावांवर बाद केले. त्यामुळे बांगलादेशने ६ धावांवर दुसरी विकेट गमावली. आतापर्यंत बांगलादेशने सात विकेट्स गमावल्या आहेत.

एकूणच, सर्वात जलद १०० एकदिवसीय विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर नेपाळचा फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने या यादीत अव्वल स्थानावर आहे. ज्याने ४२ डावात विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिन खान दुसऱ्या स्थानावर आहे, त्याने ४४ डावात १०० विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर आता शाहीन आफ्रिदीने आपले नाव त्यात जोडले आहे. ५१ डावात १०० एकदिवसीय विकेट्स घेत तो तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा: World Cup 2023: इंग्लंडच्या विश्वचषकातील कामगिरीवर रवी शास्त्री संतापले; म्हणाले, “तुम्ही स्वतःला काय गतविजेते…”

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० विकेट्स पूर्ण करणारा वेगवान गोलंदाज

५१ – शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)

५२ – मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)

५४ – शेन बाँड (न्यूझीलंड)

५४ – मुश्ताफिजुर रहमान (बांगलादेश)

एकदिवसीय सामन्यात १०० विकेट्स पूर्ण करणारा सर्वात वेगवान गोलंदाज

४२- संदीप लामिछाने (नेपाळ)

४४ – राशिद खान (अफगाणिस्तान)

५१- शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)

५२ – मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)

५३ – सकलेन मुश्ताक (पाकिस्तान)

विश्वचषक २०२३ च्या ३१व्या सामन्यात आज पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. या विश्वचषकातील बांगलादेशचा प्रवास जवळपास संपला आहे. त्यांच्याकडे गमावण्यासारखे काही नाही. अशा परिस्थितीत हा संघ इतर संघांचा खेळ खराब करण्याचा प्रयत्न करेल. त्याच वेळी, आता तिन्ही सामने पाकिस्तानसाठी करा किंवा मरोचे होणार आहेत. एका पराभवानेही त्यांचा उपांत्य फेरीचा मार्ग बंद होऊ शकतो. बांगलादेशचा कर्णधार शकिबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.