PAK vs BAN Test Series Pakistani fans angry after humiliating defeat against Bangladesh : पाकिस्तान संघला मायदेशात बांगलादेशच्या हातून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा २-० ने धुव्वा उडवला. पहिल्या कसोटी १० विकेट्सनी आणि दुसरी कसोटी बांगलादेशने ६ विकेट्सनी जिंकली. दोन्ही सामने रावळपिंडीच्या मैदानावर झाले. बांगलादेशने प्रथमच पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहते संतापले आहेत.
पाकिस्तानी चाहत खेळाडू आणि पीसीबीसह पंतप्रधानांवर संतापले –
चाहते केवळ पाकिस्तानी खेळाडूंवरच नव्हे तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावरही टीका करत आहेत. ज्यामी मीम्सचाही पूर आला आहे. एका चाहत्याने लिहिले की, “पाकिस्तानी चाहत्यांना आणखी किती रडवणार? कृपया पाकिस्तान क्रिकेट संघाला वाचवा. तुम्ही स्वप्नातून बाहेर या. पाकिस्तान खूप खाली गेला आहे. पाकिस्तान संघाला स्वतःसाठी आणि देशासाठी जिंकावे लागेल.”
कसोटी मालिका गमावल्याबद्दल आणखी एका चाहत्याने उपहासात्मक टिप्पणी केली, “याचे श्रेय आमचे दूरदर्शी पंतप्रधान शाहबाज शरीफ, पीसीबीचे प्रमुख मोहसीन नक्वी आणि त्यांच्या हँडलर्सना जाते. आता ही काही नवीन गोष्ट नाही. संपूर्ण देशाचे मनोधैर्य खचले आहे, मग क्रिकेट संघ कसा उत्साही राहील?” बाबर आझम आणि कर्णधार शान मसूद यांच्यावर अनेकांनी टीका केली, जे या मालिकेत विशेष काही करू शकले नाहीत.
हेही वाचा – Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
सामन्याबद्दल बोलायचे तर, दुसऱ्या कसोटीत बांगलादेशला १८८ धावांचे लक्ष्य मिळाले होते. बांगलादेशला शेवटच्या दिवशी 143 धावांची गरज होती आणि १० विकेट्स हातात होत्या. बांगलादेशने चार विकेट्स गमावून सहज लक्ष्य गाठले. बांगलादेशकडून सलामीवीर झाकीर हसन (४०), कर्णधार नजमुल हुसेन शांतो (३८) आणि मोमिनुल हक (३४) यांनी उपयुक्त खेळी खेळली.
पहिल्या डावात लिटन दासने (१३८) शानदार शतक तर मेहदी हसन मिराझने (७८) अर्धशतक झळकावले. बांगलादेशने दुसऱ्यांदा परदेशी भूमीवर द्विपक्षीय कसोटी मालिका जिंकली ज्यामध्ये दोन किंवा अधिक कसोटी खेळल्या गेल्या. यापूर्वी २००९ मध्ये बांगलादेशने वेस्ट इंडिजमध्ये विजय मिळवला होता. त्याचबरोबर बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्धचा पहिला कसोटी विजय आहे.