Shahid Afridi and Rashid Latif react on Pakistan defeat against Bangladesh : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पाकिस्तानच्या दारुण पराभवानंतर चाहत्यांसह पाकिस्तानी दिग्गज खेळाडूही संघाच्या कामगिरीवर जोरदार टीका करत आहेत. माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीने रावळपिंडीतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील पाकिस्तानच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले. माजी क्रिकेटपटू रशीद लतीफने पाकिस्तानच्या पराभवाची अनेक कारणे सांगितली आहेत. आफ्रिदी आणि रशीद या दोघांचेही मत आहे की, पाकिस्तानने या सामन्यासाठी चुकीच्या प्लेइंग इलेव्हनची निवड केल्याने त्यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरच्या परिस्थितीबद्दल जागरूकतेचा अभाव –

शाहिद आफ्रिदीने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “अशा प्रकारची खेळपट्टी तयार करणे, चार वेगवान गोलंदाजांची निवड करणे आणि एका स्पेशालिस्ट स्पिनरला बाहेर ठेवणे, या सर्व निर्णयांवर निर्णयावर १० विकेट्सच्या पराभवामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. माझ्या मते, हे घरच्या परिस्थितीबद्दल जागरूकतेचा अभाव दर्शवते. बांगलादेशने संपूर्ण सामन्यात ज्या प्रकारचे क्रिकेट खेळले आहे, हे पाहता त्याचे श्रेय तुम्ही घेऊ शकत नाही.”

रशीद लतीफने पाकिस्तान संघावर उपस्थित केले प्रश्न –

पहिल्या कसोटीत बांगलादेशकडून झालेल्या दारूण पराभवानंतर पाकिस्तानी संघ कमकुवत का राहिला, यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रशीद लतीफने प्रकाश टाकला. रशीद लतीफने सोशल मीडियावर डावाची घोषणा, खेळाची जागरूकता, कर्णधारपद, वाद, संभाषण, खेळपट्टीचा अहवाल आणि प्लेइंग इलेव्हन याबाबत एक्सवर पोस्ट केली असून या मुद्यांवर पाकिस्तान संघ पूर्णपणे चुकीचा असल्याचे म्हटले आहे. मात्र, संघात एकता आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – PAK vs BAN : पाकिस्तानची बांगलादेशविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर क्रिकेट विश्वात फजिती! डब्ल्यूटीसी गुणतालिकेतही घसरण

पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने केल्या सर्वाधिक धावा –

या सामन्यात पाकिस्तानने आपला पहिला डाव ६ बाद ४४८ धावांवर करून घोषित केला होता. प्रत्युत्तरात बांगलादेशने सर्वबाद ५६५ धावा केल्या आणि ११७ धावांची आघाडी घेतली. पाकिस्तानने सकाळी दुसऱ्या डावात १ गडी गमावून २३ धावांची आघाडी घेतली पण नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. पहिल्या डावात १७१ धावा करणाऱ्या मोहम्मद रिझवानने दुसऱ्या डावात सर्वाधिक ५१ धावा केल्या. मात्र, त्याला दुसऱ्या टोकाकडून कोणतीही मदत मिळाली नाही.

हेही वाचा – Manu Bhaker : मनू भाकेर सूर्यकुमार यादवकडून शिकतेय क्रिकेट, इन्स्टा स्टोरीवर शेअर केला खास फोटो

पाकिस्तानच्या फक्त चार खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला –

विशेष म्हणजे पाकिस्तानकडून केवळ चार फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. यामध्ये रिझवानशिवाय सलामीवीर अब्दुल्ला शफीक (३७), माजी कर्णधार बाबर आझम (२२) आणि विद्यमान कर्णधार शान मसूद (१४) यांचा समावेश आहे. बांगलादेशकडून मेहदी आणि शकीब व्यतिरिक्त तीन वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs ban test shahid afridi and rashid latif raise question on pakistan team after embarrassing defeat bangladesh vbm