पाकिस्तान विरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात, इंग्लंडचा दुसरा डाव २७५ धावांवर आटोपला. इंग्लंडने पाकिस्तानला विजयासाठी ३५५ धावांचे लक्ष्य दिले आहे. दुसऱ्या डावात मोहम्मद रिझवान पाकिस्तानकडून सलामीवीर म्हणून फलंदाजीला आला, पण ४० वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने त्याच्या किलर बॉलवर रिझवानला बोल्ड केले. रिझवान कसा बाद झाला, याचा त्याला विश्वास बसला नाही.
कारण त्याला काही समजायच्या आतच चेंडू यष्टीवर आदळला होता. आऊट झाल्यानंतर रिझवानची ज्या पद्धतीने प्रतिक्रिया होती, ते पाहता तो बाद झाल्याचे खात्री नसल्याचे दिसत होते. वास्तविक, रिझवानला जो चेंडू टाकला गेला, तो चेंडू अशा प्रकारे फेकला गेला की खेळपट्टीला आदळल्यानंतर चेंडू स्टंपच्या आत जाण्यापूर्वी चेंडूने हवेतच आपली दिशा बदलली. त्याचवेळी, रिझवान बचावात्मक पद्धतीने बॅटला चेंडूच्या रेषेत आणण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू बॅटला आदळण्याऐवजी चेंडू सरळ ऑफ-स्टंपवर जाऊन आदळला. हे पाहून रिझवान देखील अवाक झाला. त्यामुळे पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात रिझवानला ४३ चेंडूत केवळ ३० धावा करता आल्या.
रिझवान बाद होताच काही वेळ त्याच पोझमध्ये उभा राहिला आणि गोलंदाज अँडरसनच्या चेहऱ्याकडे एकटक बघत राहिला. खेळपट्टीवर काही वेळ घालवल्यानंतर पाकिस्तानी फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. त्यानंतर अँडरसनच्या गोलंदाजीवर चाहते सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. ‘सिंह नक्कीच म्हातारा झाला आहे, पण शिकार करायला विसरला नाही’ असंही लोक लिहू लागले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये रिझवान गोलंदाज तिसऱ्यांदा अँडरसनचा बळी ठरला आहे. पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा पाकिस्तान संघाने ४ विकेट्स गमावून १९८ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्यांना विजयासाठी १५७ धावांची गरज आहे.