PAK vs ENG Chris Woakes made fun of Pakistan Team : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंड संघाने मोठ्या सहजतेने जिंकला आहे. इंग्लंडने हा सामना एक डाव आणि ४७ धावांनी जिंकला. या सामन्यादरम्यान खेळपट्टी हा चर्चेचा विषय ठरला होता. या सामन्यात पहिल्या डावात ५५६ धावा करूनही इंग्लंडने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. दरम्यान, इंग्लंडचा वेगवागन गोलंदाज क्रिस वोक्सने पुढील दोन सामन्यांच्या खेळपट्टीबाबत बोलताना पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.
ख्रिस वोक्स काय म्हणाला?
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स म्हणाला की, पहिल्या कसोटी सामन्यात सपाट खेळपट्टीवर झालेल्या पराभवामुळे, पाकिस्तान संघ पुढील दोन सामन्यांसाठी मुलतान आणि रावळपिंडी येथे हिरव्या खेळपट्ट्या किंवा तीव्र वळण असलेल्या खेळपट्ट्यांचा वापर करू शकतो. मुलतानमध्ये इंग्लंडच्या विजयानंतर ख्रिस वोक्सने ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना पाकिस्तानची खिल्ली उडवली.
ख्रिस वोक्स म्हणाला, ‘पहिली कसोटी सुरू होण्यापूर्वी हिरव्या खेळपट्टीबाबत चर्चा झाली होती. मला वाटते की पहिल्या दिवशी ती थोडी हिरवी होते, परंतु ती नंतर आणखी चांगली होत गेली. आता चेंडू पूर्णपणे त्यांच्या कोर्टात आहे. जेव्हा घरच्या मैदानावर मालिका असेल आणि फक्त तीन सामने असतील आणि तुम्ही पहिला सामना हरलात, तेव्हा तुम्हाला असे वाटेल की पुढील दोन सामने निकालाभिमुख होतील, मग ती हिरवीगार खेळपट्टी असो की वळण घेणारी खेळपट्टी असो आम्ही त्यासाठी तयार आहे.’
हेही वाचा – Manu Bhaker : मनू भाकेरच्या रॅम्प वॉकसमोर मॉडेल्सही पडतील फिक्या, लॅक्मे फॅशन वीकमधील VIDEO होतोय व्हायरल
कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानची अवस्था अत्यंत वाईट –
कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. मायदेशातही संघाला सामने जिंकण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानने १३४२ दिवसांपूर्वी घरच्या मैदानावर शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. पाकिस्तान संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही शेवटच्या स्थानावर आला आहे. या मालिकेत अजून दोन सामने बाकी आहेत. पाकिस्तान संघ हे दोन्ही सामने आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरून या मालिकेत पुनरागमन करू शकेल. मात्र, फॉर्मात असलेल्या या इंग्लंड संघाला पराभूत करणे त्यांच्यासाठी सोपे काम असणार नाही.