Pakistan vs England ICC Cricket World Cup 2023 Match Updates: पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा विश्वचषक २०२३मधील प्रवास अखेर संपुष्टात आला. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेले ३३८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी हा सामना ४० चेंडूत जिंकावा लागणार होता, जे की अशक्य काम होते. त्यांनी ६.४ षटकांत पार केले असते तर पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला असता. मात्र, बाबर आझमच्या संघाला पूर्ण षटकात देखील हा सामना जिंकता आला नाही. इंग्लंडने हा सामना ९३ धावांनी जिंकत २०२५ साली पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत थेट पात्र झाले आहेत. उपांत्य फेरीत १५ नोव्हेंबरला भारत-न्यूझीलंड (मुंबई) आणि १६ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका ( कोलकाता) अशा लढती होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकदिवसीय विश्वचषकाच्या ४४व्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा ९३ धावांनी पराभव केला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ गडी गमावून ३३७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ४३.३ षटकांत २४४ धावांवर सर्वबाद झाला आणि सामना गमावला. डेव्हिड विलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला

इंग्लंडने पाकिस्तानचा ९३ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह इंग्लंडने पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. त्याचवेळी, २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातील पाकिस्तान आणि इंग्लंडचा प्रवास संपला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलिया आणि अखेर न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता १५ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. त्याचवेळी, १६ नोव्हेंबरला दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन संघ कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.

या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ गडी गमावून ३३७ धावा केल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने ८४, जो रूटने ६० आणि जॉनी बेअरस्टोने ५९ धावा केल्या. डेव्हिड मलानने ३१, हॅरी ब्रूकने ३० आणि जोस बटलरने २७ धावा केल्या. पाकिस्तानकडून हारिस रौफने तीन विकेट्स घेतल्या. शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांना प्रत्येकी दोन गडी बाद करण्यात यश मिळाले. इफ्तिखार अहमदने एक विकेट घेत त्यांना मदत केली. ३३८ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने २४४ धावा केल्या. आघा सलमानने सर्वाधिक ५१ धावा केल्या. कर्णधार बाबरने ३८ तर रिझवानने ३६ धावा केल्या. शेवटी हारिस रौफने ३५ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने तीन विकेट्स घेतल्या. आदिल रशीद, गुस ऍटकिन्सन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. ख्रिस वोक्सने एक विकेट घेतली.

हेही वाचा: IND vs NED: नेदरलँड्सविरुद्ध अश्विन-इशानला संधी मिळणार की विजयी संघाबरोबर जाणार? जाणून घ्या रोहित शर्माची रणनीती

पाकिस्तानची मागील सहा एकदिवसीय विश्वचषकातील कामगिरी:

२००३ – उपांत्य फेरीसाठी पात्र नाही

२००७ – उपांत्य फेरीसाठी पात्र नाही

२०११ – उपांत्य फेरीत पराभव (भारताने पराभव केला होता)

२०१५ – उपांत्य फेरीसाठी पात्र नाही

२०१९ -उपांत्य फेरीसाठी पात्र नाही

२०२३ – उपांत्य फेरीसाठी पात्र नाही

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs eng england resounding win over pakistan by 93 runs qualified for the champions trophy 2025 avw
Show comments