PAK vs ENG Babar Azam dropped from Pakistan Test Team : इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाचा एक डाव आणि ४७ धावांनी पराभव झाला होता. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुढील दोन कसोटी सामन्यांसाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली. विशेष म्हणजे या संघातून बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह या खेळाडूंना वगळण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीकडून हा निर्णय अपेक्षित नव्हता पण त्यांनी बाबरला वगळून सर्वांनाच चकित केले आहे. बाबरला वगळल्यानंतर आता पाकिस्तान संघाचा सलामीवीर फखर जमानने एक ट्विट केले. त्याने बोर्डाच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले असून विराट कोहलीचे उदाहरण दिले आहे.

खराब फॉर्ममध्ये कोहलीला संघातून वगळण्यात आले नव्हते –

इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा झाल्यानंतर फखर जमानने नाराजी व्यक्त केली आहे. त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘बाबर आझमला वगळण्याचा सल्ला ऐकून चिंताजनक वाटते. कारण भारतीय संघाने २०२० ते २०२३ या काळात विराट कोहलीची सरासरी १९.३३, २८.२१ आणि २६.५० अशी असतानाही त्याला संघातून वगळले नव्हते. जर आम्ही आमच्या आघाडीच्या फलंदाजाला बाजूला करण्याचा विचार करत आहोत, जो पाकिस्तानचा आजवरचा सर्वोत्तम फलंदाज आहे, तर या निर्णयाने संघात नकारात्मक संदेश जाऊ शकतो. पॅनिक बटण दाबणे टाळण्यासाठी अजूनही वेळ आहे. आपल्या प्रमुख खेळाडूंना कमी लेखण्याऐवजी आपण त्यांना संधी दिली पाहिजे.’

IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
IND vs ENG R Ashwin on England Team There is a very fine line between playing aggressive brand of cricket and reckless cricket
IND vs ENG : आक्रमक आणि बेफिकीर यात फरक आहे; इंग्लंडचा खेळ पाहून अश्विनची टीका
Varun Chakravarthy 5 Wicket Haul IND vs ENG 3rd T20I Rajkot Watch Video
IND vs ENG: वरूण चक्रवर्तीने ५ विकेट्स घेत घडवला इतिहास, बुमराह-शमी कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
West Indies Beat Pakistan by 120 Runs Records Historic Win at Multan Test After 35 Years
PAK vs WI: वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर ३५ वर्षांनी ऐतिहासिक कसोटी विजय, यजमान स्वत:च्याच जाळ्यात अडकले; सामन्यात नेमकं काय घडलं?
Ravi Bishnoi Reveals Inside Chat With Tilak Varma During Match Winning Partnership vs England
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
India Beat England by 2 Wickets Tilak Varma Fifty Ravi Bishnoi Washington Sundar
IND vs ENG: भारताचा विजयी ‘तिलक’, नाट्यमय लढतीत इंग्लंडवर केली मात; बिश्नोईची साथ ठरली निर्णायक
IND vs ENG Abhishek Sharma Credits Gautam Gambhir and Suryakumar Yadav's Backing For His Return To Form
IND vs ENG : ‘मला पूर्ण स्वातंत्र्य दिले…’, अभिषेक शर्माने आपल्या वादळी खेळीचे श्रेय कोणाला दिले? जाणून घ्या

बाबरला शेवटच्या १८ कसोटी डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावता आले नाही –

बाबर आझम कसोटी क्रिकेटमधील त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे, ज्यामध्ये त्याला गेल्या १८ डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. याशिवाय बाबर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बॅटने काही खास कामगिरी करताना दिसला नाही. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी बाबरने मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये पाकिस्तानी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता कसोटी संघातून बाहेर पडणे बाबरसाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही.

हेही वाचा – IND-W vs AUS-W Live score : ऑस्ट्रेलियाचे ४ खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले, ग्रेस हॅरिस ४० धावा करून बाद

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ :

शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसीबुल्ला (विकेटकीपर), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), नोमान अली, सईम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा, जाहिद मेहमूद.

Story img Loader