पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा संघ खराब स्थितीत दिसत आहे. संघ दुसऱ्या डावात २१६ धावांवर बाद झाला. या डावात इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या रेहान अहमदने गोलंदाजी करताना आपले पंजे उघडले. त्याने पहिल्या डावात २ बळीही घेतले होते. त्याने पदार्पणाच्या कसोटीतच ७ बळी घेतले आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे १८ वर्षांचा रेहान अहमद. ‘चैन कुली की मैन कुली’ या चित्रपटाच्या कथानकानुसार बाल कलाकार करण सारखाच इंग्लंडचा गोलंदाज रेहान अहमद मैदानात उतरला आणि शानदार कामगिरी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानने पहिल्या डावात कर्णधार बाबर आजमच्या ७६ आणि आघा सलमान ५६ यांच्या अर्धशतकाच्या बळावर ३०४ धावा केल्या. जॅक लिचने चार, तर रेहानने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात इंग्लंडची खराब सुरुवात झाली होती. ऑली पोप (५१) व बेन फोक्स (६४) यांचे अर्धशतक आणि हॅरी ब्रूक (१११) याच्या शतकाने इंग्लंडला सावरले अन् ३५४ धावा करून ५० धावांची आघाडी घेतली. अब्रार अहमद व नौमान अली यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले.

रेहान इंग्लंडकडून कसोटी पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. रेहानचा जन्म १३ ऑगस्ट २००४ रोजी नॉटिंगहॅममध्ये झाला. रेहानचे वडील नईम अहमद हे पाकिस्तानचे आहेत. वडील नईम अहमद पाकिस्तानातून इंग्लंडमध्ये स्थायिक झाले होते. रेहान २०१७ मध्ये लीसेस्टरशायरचा भाग बनला आणि २०२१ मध्ये त्याने लीसेस्टरशायरसाठी लिस्ट-अ मध्ये पदार्पण केले.

त्याच वर्षी त्याला इंग्लंडच्या अंडर-१९ संघात स्थान मिळाले. रेहानने आयसीसी अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये १२ गडी बाद केले होते. यानंतर मे २०२२ मध्ये त्याने फर्स्ट क्लास करिअरला सुरुवात केली. प्रथम श्रेणी पदार्पणात तो बॉल आणि बॅट या दोन्ही बाबतीत अपयशी ठरला. पहिल्या सामन्यात त्याने ० आणि १६ धावा केल्या आणि त्याला कोणतेही यश मिळाले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs eng know who is rehan ahmed who opened his paw against pakistan in debut test avw