PAK vs ENG Ben Stokes react on PCB dropping Babar Azam : पाकिस्तान आणि इंग्लंड संघात खेळली जात असलेली कसोटी मालिका बरीच चर्चेत आहे. पाकिस्तान दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये खूप मोठा बदल करण्यात आला आहे. संघाचे प्रमुख खेळाडू बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना संघातून वगळण्याची जोरदरा चर्चा सुरु आहे.पीसीबीचा हा निर्णय अनेक तज्ञ आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना चकित करणारा आहे. त्याचवेळी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने या विषयावर आपले मत देण्यास स्पष्ट नकार दिला. हा पाकिस्तान क्रिकेटचा मुद्दा असल्याचे त्याने म्हटले आहे.
बेन स्टोक्स काय म्हणाला?
वास्तविक, सोमवारी पत्रकार परिषदेत बेन स्टोक्सला विचारण्यात आले की, बाबर, शाहीन आणि नसीम यांना पाकिस्तान संघातून वगळण्यात आले आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यावर स्टोक्स म्हणाला, “हा पाकिस्तान क्रिकेटचा मुद्दा आहे. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही.” स्टोक्स अनफिट असल्यामुळे पाकिस्तानविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत तो खेळताना दिसणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. ८२३/७ अशी मोठी धावसंख्या उभारून इंग्लंडने पहिला सामना एक डाव आणि ४७ धावांनी जिंकला.
पाकिस्तानच्या निवड समितीचे सदस्य काय म्हणाले?
स्टार खेळाडूंच्या वगळण्यावर पाकिस्तानच्या निवड समितीचे सदस्य आकिब जावेद म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या विश्रांतीमुळे या खेळाडूंना त्यांची तंदुरुस्ती, आत्मविश्वास आणि मानसिक स्थिरता परत मिळण्यास मदत होईल. त्यामुळे भविष्यातील आव्हानांसाठी ते अजूनही बळकट होऊन पुनरागमन करतील. ते अजूनही आमच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असून पाकिस्तान क्रिकेटमध्ये योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहेत, जेणेकरून ते आणखी बळकट होऊ पुनरागमन करतील.
पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार फिरकी गोलंदाजांना संधी –
पाकिस्तानने उद्यापासून म्हणजेच १५ ऑक्टोबरपासून मुलतानमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानने प्लेइंग इलेव्हनमध्ये चार फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे, तर केवळ एका वेगवान गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये कामरान गुलाम पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), कामरान गुलाम, सौद शकील (उपकर्णधार), मोहम्मद रिझवान, (यष्टीरक्षक) सलमान अली आगा, आमिर जमाल, नोमान अली, साजिद खान, जाहिद महमूद.
हेही वाचा – IND vs AUS : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडू झाला बाहेर
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ब्रायडन कार्स, मॅट पॉट्स, जॅक लीच, शोएब बशीर