पाकिस्तानी संघाने मालिकेतील चौथ्या टी२० च्या रोमहर्षक सामन्यात इंग्लंडचा तीन धावांनी पराभव केला. रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने तीन धावांनी अगदी जवळून विजय नोंदवला. यासह मालिकेत आता २-२ अशी बरोबरी झाली आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना रिजवान अहमदच्या आणखी एका शानदार अर्धशतकाच्या जोरावर ४ गड्यांच्या मोबदल्यात १६६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १६३ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानच्या विजयाचे खरे शिल्पकार हे फलंदाज मोहम्मद रिझवान आणि गोलंदाज हॅरिस रौफ ठरले.

पाकिस्तानसोबतच्या ७ सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात १६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंड संघाची सुरुवात खराब झाली. त्याचे पहिले ४ गडी अवघ्या ५७ धावांत पडले. फिल सॉल्ट, अॅलेक्स हेल्स, विल जॅक आणि बेन डकेट पूर्णपणे अपयशी ठरले. यानंतर हॅरी ब्रूक्स (३४) आणि कर्णधार मोईन अली (२९) यांनी चांगली भागीदारी करत सामना इंग्लंडच्या दिशेने वळवला, मात्र ही जोडी तुटल्यानंतर इंग्लंड संघाला सावरता आले नाही.

हेही वाचा :  IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धवन कर्णधार असेल, टी२० संघातील सर्व खेळाडूंना विश्रांती 

१९व्या षटकात हारिस रौफने अप्रतिम गोलंदाजी करत पाकिस्तानचा विजय जवळपास निश्चित केला. या षटकात रौफने सलग २ बळी घेतले. रीस टॅापले शेवटच्या षटकात एक धाव चोरण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला आणि संघाने सामना तीन धावांनी गमावला.

पाकिस्तानी गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना टिकू दिले नाही

१६६ धावांचे तुलनेने छोटे लक्ष्य पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पेलणे सोपे नव्हते, पण पाकिस्तानच्या गोलंदाजांनी ते पार पाडले. पाकिस्तानकडून हरिस रौफ आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. त्याचवेळी मोहम्मद हसनैनेही २ बळी घेतले. इंग्लंडच्या डावात पाकिस्तानी गोलंदाजांनी त्यांच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही.

हेही वाचा :   विश्लेषण: ‘मांकडिंग’ची चर्चा नव्याने का सुरू झाली? इंग्लिश क्रिकेटप्रेमींना त्याचे वावडे का?

पुन्हा एकदा रिझवानने शानदार खेळी केली

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाने १६६ धावा केल्या, ज्यामध्ये मोहम्मद रिझवानच्या ८८ धावांच्या शानदार खेळीचा समावेश होता. या खेळीत त्याने एकूण ९ चौकार आणि एक शानदार षटकार ठोकला. त्याचवेळी कर्णधार बाबर आझमने ३६ धावा केल्या. या मालिकेतील तिसरा सामना इंग्लंडने ६३ धावांनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने १० गडी राखून विजय मिळवला. आता दोन्ही संघांच्या नजरा पुढील टी२० जिंकून मालिकेत आघाडी घेण्यावर असतील.

Story img Loader