PAK vs ENG 2nd Test Match Pitch Updates : गेल्या काही काळापासून पाकिस्तानी संघ अत्यंत खराब टप्प्यातून जात आहे. संघाचे गोलंदाज आणि फलंदाज चांगली कामगिरी करत नाहीत. पाकिस्तानचे प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत आहेत. अलीकडेच पाकिस्तानी संघाला बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका २-० अशी गमवावी लागली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात एक डाव आणि ४७ धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. हा सामना मुलतानच्या स्टेडियममध्ये खेळला गेला. आता उभय संघांमधील दुसरी कसोटीही १५ ऑक्टोबरपासून मुलतानमध्ये खेळवली जाणार आहे. या सामन्याच्या खेळपट्टीबाबत पाकिस्तानने मोठा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानचा दुसऱ्या कसोटीसाठी खेळपट्टीबाबत मोठा निर्णय –

ईएसपीएनक्रिकइंन्फोच्या वृत्तानुसार, इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसरी कसोटी मुल्तानमध्ये त्याच खेळपट्टीवर खेळली जाईल, ज्यावर पहिली कसोटी खेळली गेली होती. ज्यामुळे एकच खेळपट्टी दोनदा वापरली जाणार आङे. पहिल्या कसोटीनंतर ग्राउंड स्टाफने पाणी भरले होते. आता ते पाणी खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंना पंखे आणि सूर्यप्रकाशाने सुकवले जात आहे. रविवारी दोन्ही संघांनी सराव सत्राचे आयोजन केले होते.

IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Rohit Sharma Statement on India Defeat in Pink Ball Test Said we didnt play well enough to win the game
IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?
Australia Beat India by 10 Wickets in Pink Ball Test Pat Cummins 5 Wickets Nitish Reddy 42 Runs Inning
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय
England Beat New Zealand by 323 Runs in 2nd Test and win Series Joe Root Harry Brook Century
NZ vs ENG: न्यूझीलंडचा मोठा पराभव! टीम इंडियाला चीतपट करणाऱ्या किवींची घरच्या मैदानावर इंग्लंडसमोर शरणागती

पाकिस्तान एका विजयासाठी आसुसलेला –

पाकिस्तानचे कसोटी प्रशिक्षक जेसन गिलेस्पी आणि कसोटी कर्णधार शान मसूद यांनी सकाळी खेळपट्टी पाहिली होती. त्यानंतर गिलेस्पीने पीसीबीचे ऑस्ट्रेलियन मुख्य क्युरेटर टोनी हेमिंग यांच्याशी दीर्घ संभाषण केले. पहिल्या कसोटी सामन्यानंतर, खेळपट्टीवर पावलांचे ठसे दिसत होते, जे पंख्याच्या वाऱ्याने आणि सूर्यप्रकाशामुळे आणखी कोरडे झाले होते. कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर विजय मिळवणे खूप सोपे असते, कारण त्याला घरच्या परिस्थितीचा फायदा मिळतो, पण पाकिस्तानमध्ये याच्या उलट घडत आहे. घरच्या शेवटच्या ११ कसोटी सामन्यांनंतर पाकिस्तान विजयासाठी आसुसलेला आहे.

हेही वाचा – IND vs BAN : सूर्याच्या टीम इंडियाने T20I मध्ये मोडला पाकिस्तानचा मोठा विक्रम, केला ‘हा’ खास पराक्रम

दुसऱ्या कसोटीत बेन स्टोक्सच्या पुनरागमनाची शक्यता –

मुलतानमध्ये ज्या खेळपट्टीवर पहिला कसोटी सामना खेळला गेला. त्याच ट्रॅकवर दुसरी कसोटी असेल, तर खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरू शकते. कारण त्यावर आधीच पाच दिवस सामने खेळले गेले आहेत आणि गोलंदाजांच्या पावलांचे ठसे दिसत आहेत. अशा स्थितीत बेन स्टोक्सचे इंग्लंड संघात पुनरागमन होऊ शकते. दुखापतीमुळे स्टोक्स पहिल्या कसोटीत खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी कर्णधारपदाची धुरा ऑली पोपने सांभाळली.

Story img Loader