PAK vs ENG PCB upset on Fakhar Zaman post about Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. या संघातून बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे स्टार फलंदाज बाबर आझमला वगळण्यातनंतर नाराजी व्यक्त करत फखर जमानने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने विराट कोहली आणि बीसीसीआयचे उदाहरण देताना, पीसीबीच्या निर्णयावर टीका केली होती. फखर जमानच्या या वक्तव्यानंतर पीसीबीचे अधिकारी नाराज झाले आहेत.

पाकिस्तानच्या कसोटी संघातून बाबर आझमला वगळल्यानंतर फखर जमान म्हणाला की, पीसीबीने बीसीसीआयकडून शिकायला हवे. कारण विराट कोहली जेव्हा खराब फॉर्ममधून जात होता, तेव्हा बीसीसीआयने त्याला न वगळता सावरण्यासाठी पाठिंबा देताना बऱ्याच संधी दिल्या होत्या. त्याचप्रमाणे पीसीबीनेही बाबरसारख्या प्रमुख फलंदाजाला डावलण्याऐवजी त्याला पाठिंबा द्यावा. फखर जमानच्या या पोस्टनंतर पीसीबीचे काही मोठे पदाधिकारी नाराज आहेत.

IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’

पीसीबीचे अधिकारी फखर जमानवर नाराज –

आता पीटीआयचा हवाला देत पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील एका सूत्राने सांगितले की, बोर्डातील अनेक वरिष्ठ अधिकारी फखरच्या या पोस्टने खूश नाहीत. या सूत्राने सांगितले की, “बोर्डाचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी फखर जमानने केलेल्या पोस्टवर खूश नाहीत. या संदर्भात अधिकाऱ्यांनीही फखर जमानशी संपर्क साधला आहे.” आम्ही तुम्हाला सांगतो की, फखर जमान मे २०२४ पासून पाकिस्तान संघातून बाहेर आहे.

हेही वाचा – Sanju Samson : संजूने इशानला मागे टाकत मोडला डी कॉकचा विक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

फखर जमान नक्की काय म्हणाला होता?

फखर जमानने ट्वीटमध्ये लिहिले होती की, ‘बाबर आझमला वगळण्याचा सल्ला ऐकून चिंताजनक वाटते. कारण बीसीसीआयने २०२० ते २०२३ या काळात विराट कोहलीची सरासरी १९.३३, २८.२१ आणि २६.५० अशी असतानाही त्याला संघातून वगळले नव्हते. जर आम्ही आमच्या आघाडीच्या फलंदाजाला बाजूला करण्याचा विचार करत आहोत, जो पाकिस्तानचा आजवरचा सर्वोत्तम फलंदाज आहे, तर या निर्णयाने संघात नकारात्मक संदेश जाऊ शकतो. पॅनिक बटण दाबणे टाळण्यासाठी अजूनही वेळ आहे. आपल्या प्रमुख खेळाडूंना कमी लेखण्याऐवजी आपण त्यांना संधी दिली पाहिजे.’

हेही वाचा – IND vs AUS : ‘जेव्हा मी आणि दीप्ती फलंदाजी करत होतो, तेव्हा…’, हरमनप्रीत कौरने सांगितले भारताच्या पराभवाचे कारण

बाबरला शेवटच्या १८ कसोटी डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावता आले नाही –

बाबर आझम कसोटी क्रिकेटमधील त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे, ज्यामध्ये त्याला गेल्या १८ डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. याशिवाय बाबर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बॅटने काही खास कामगिरी करताना दिसला नाही. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी बाबरने मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये पाकिस्तानी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता कसोटी संघातून बाहेर पडणे बाबरसाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही.