ICC Cricket World Cup 2023, Pakistan vs Netherlands: आयसीसी क्रिकेट विश्वचषका २०२३ चा दुसरा सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला जात आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँड्स संघाने चांगली सुरुवात केली आणि अवघ्या ३८ धावांवर पाकिस्तानचे ३ विकेट्स घेतल्या. मात्र, त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी पाकिस्तानचा डाव सांभाळत सन्मानजनक धावसंख्या उभारली.
मात्र, पाकिस्तानचा संघ पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही. पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४९ षटकांत २८६ धावा करून ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा मोहम्मद रिझवानने केल्या. त्याने ७५ चेंडूत ६८ धावा केल्या आणि सौद शकीलने ५२ चेंडूत ६८ धावा केल्या. याशिवाय मोहम्मद नवाजने ३९ धावांची तर शादाब खानने ३२ धावांची खेळी खेळली. या ४ फलंदाजांशिवाय पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला २० धावाही करता आल्या नाहीत. बाबर आझमलाही या सामन्यात केवळ ५ धावा करता आल्या. अशा प्रकारे पाकिस्तानने ४९ षटकात २८६ धावा केल्या आणि सर्वबाद झाला.
नेदरलँड्सने ८ गोलंदाजांचा केला वापर –
नेदरलँड्सच्या कर्णधाराने आपल्या ८ गोलंदाजांचा वापर केला आणि बास डी लीडेने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याने मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान आणि हसन अली यांच्या ९ षटकांत ६२ धावा देऊन विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय कॉलिन अकरमनने ८ षटकांत ३९ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्यांच्याशिवाय आर्यन दत्त, लोगन व्हॅन बीक आणि पॉल व्हॅन मीकरेन यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा – Asian Games: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, ९ वर्षांनी सुवर्णपदकावर कोरले नाव
हैदराबादच्या खेळपट्टीवर खेळला जाणारा सराव सामना पाहता या मैदानावर २८६ धावांचा पाठलाग करणे फार अवघड नाही, असे दिसते. आता या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला हरवून नेदरलँड्स या लक्ष्याचा पाठलाग करून मोठा अपसेट निर्माण करू शकतो का, हे पाहावे लागेल.