PAK vs NEP, Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेच्या १६व्या आवृत्तीला बुधवारी (३० ऑगस्ट) सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दुबळ्या नेपाळसमोर यजमान पाकिस्तानचे ३४३ धावांचे डोंगराएवढे ठेवले आव्हान आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने ५० षटकांत ६ बाद ३४२ धावा केल्या. त्याच्याकडून बाबर आझमने १५१ आणि इफ्तिखार अहमदने नाबाद १०९ धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने नेपाळसमोर ३४३ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. पाकिस्तानने ५० षटकांत ६ बाद ३४२ धावा केल्या. त्यासाठी कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक १५१ धावा केल्या. त्याने १३१ चेंडूंच्या खेळीत १४ चौकार आणि चार षटकार मारले त्याला सोमपाल कामीने बाद केले. इफ्तिखार अहमदने ७१ चेंडूत १०९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि ४ षटकार मारले. बाबरच्या कारकिर्दीतील हे १९वे शतक आहे. त्याचवेळी इफ्तिखारने पहिले शतक झळकावले. दोघांमधील १३१ चेंडूत २१४ धावांची अप्रतिम भागीदारीने पाकिस्तानला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली.

Gautam Gambhir and Virat Kohli on Jasprit Bumrah Mohammed Shami and Mohammed Siraj
Gautam Gambhir : बुमराह, शमी, सिराजसाठी गोलंदाजी हीच ‘ध्यानधारणा व मन:शांती’, गौतम गंभीरचे वक्तव्य
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
pakistani army chief asim munir
Kargil War : २५ वर्षांनंतर पाकिस्तान सैन्याने मान्य केली कारगिल युद्धातील भूमिका; लष्करप्रमुख असीम मुनीर म्हणाले, “आमच्या सैनिकांनी…”
Bangladesh historic victory over Pakistan, cricket,
विश्लेषण : बांगलादेशने कसा साकारला पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय? भारताला धक्का देण्याची शक्यता किती?
Pakistan Former Cricketer Javed Miandad Inzamam Ul aq Slams PCB and Cricket Team for Poor Performance PAK vs BAN
PAK vs BAN: “हा एक वाईट संकेत आहे…” फक्त खेळाडू नाही तर PCB वरही भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; जावेद मियांदाद, इंजमाम यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष
PAK vs BAN Test Ahmad Shahzad mocking on Pakistan team
PAK vs BAN Test Series : लाजिरवाण्या पराभवानंतर अहमद शहजादने पाकिस्तानची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘बांगलादेशने तुम्हाला तुमच्याच…’
Kamran Akmal big statement on Virat Kohli and Rohit Sharma
Kamran Akmal : कोहली-रोहितबद्दल कामरान अकमलचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “पाकिस्तानमध्ये विराटपेक्षा जास्त तर…”
Ramiz Raja on PAK vs BAN Test
PAK vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर रमीझ राजा संतापले; म्हणाले, ‘आशिया कपमध्येच भारताने पाकिस्तानची…’

प्रथमच आशिया चषक खेळणाऱ्या नेपाळने पहिल्याच सामन्यात यजमान पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळतेय. फखर जमान व इमाम-उल-हक या सलामीवीरांना २५ धावांवरच नेपाळने माघारी पाठवले. नेपाळचा कर्णधार रोहितच्या डायरेक्ट हिटवर इमाम रन आऊट झाला. कर्णधार बाबर व मोहम्मद रिझवान या अनुभवी खेळाडूंनी पाकिस्तानचा डाव सावरला. पण, नेपाळच्या टिच्चून माऱ्यासमोर त्यांच्या धावांना वेग मिळाला नाही. या दडपणात त्यांच्याकडून चूकाही झाल्या अन् रिझवान सैरभैर झालेला दिसला. त्याच गोंधळात त्याने स्वतःची विकेट फेकली.

यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने ४४ धावांचे योगदान दिले. फखर जमान १४ धावा करून बाद झाला. इमाम उल हक आणि आगा सलमानने प्रत्येकी पाच धावा केल्या. तर शादाब खान चार धावा करून बाद झाला. नेपाळकडून सोमपाल कामीने दोन विकेट्स घेतल्या. करण केसी आणि संदीप लामिछाने यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

हेही वाचा: IND vs PAK Head-to-Head: सहा वर्षांपासून वन डे क्रिकेटमध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध अपराजित, ‘हा’ आहे आशिया कपमधील विक्रम

बाबर आझमने झळकावले शानदार दीडशतक

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आशिया चषकाची सुरुवात जबरदस्त केली. पहिल्याच सामन्यात त्याने नेपाळविरुद्ध दीडशतक ठोकले आणि तगड्या फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले. बाबर आझम याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने आशिया चषक २०२३च्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने अवघ्या २५ धावांवर दोन महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या. मात्र, त्यानंतर बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि शतक ठोकले. बाबरने १०९ चेंडूत शतक पूर्ण केले. बाबरच्या वन डे कारकिर्दीतील हे १९वे शतक ठरले. त्याच्यापुढे पाकिस्तानचा माजी डावखुरा सलामीवीर सईद अनवर असून त्याने २० शतक केले आहेत.

हेही वाचा: PAK vs NEP: नंबर १ पाकिस्तानला एक रन घेणं पडलं महाग, रोहितचा रॉकेट थ्रो अन् इमाम उल हक थेट तंबूत; पाहा Video

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

पाकिस्तान: फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.

नेपाळ: कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), आरिफ शेख, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग ऐरे, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजवंशी.